एक लाख सत्तर हजारांच्या लाचेची मागणी
इगतपुरी नगरपरिषदेचे तीन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
सीसीटीव्ही बसवणे, कॉम्प्युटर प्रिंटर पुरवणे, त्याची देखभाल दुरुस्ती करण्याच्या कामाचे बिल अदा करण्याच्या मोबदल्यात स्वतः आणि मुख्याधिकारी यांच्यासाठी तब्बल 1 लाख 90 हजार रुपये लाचेची मागणी करत तडजोडीत 1 लाख 70 हजार रुपये मागणी करणाऱ्या इगतपुरी नगरपालिकेतील तीन कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचत पकडले. सफाई कामगार नितीन दगडू लोखंडे, संगणक अभियंता सूरज रवींद्र पाटील, लेखापाल सोमनाथ बोराडे अशी लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदार यांनी इगतपुरी येथे नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसवले आहेत. तसेच कॉम्प्युटर प्रिंटर पुरवणे आणि त्याच्या देखभाल दुरुस्ती ची कामे केली आहेत, या कामांचे बिल अदा करण्याच्या मोबदल्यात वरील तिघांनी 27 टक्क्यांप्रमाणे1 लाख 90 हजार रुपये लाच मागितली होती, त्यापैकी 1 लाख 70 हजारांची मागणी केली होती।. तक्रारदार यांनी यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्राराची पडताळणी करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या नेतृत्वात हवालदार संदीप हँडगे, सुरेश चव्हाण, प्रफुल्ल माळी यांनी ही कारवाई केली. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
ठाकरे गटाला मोठा धक्का: चार दिवसांपूर्वी नियुक्त केलेले महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपात करणार प्रवेश उपनेते…
पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…
वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…
भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…
पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…
शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…