बोरगावजवळ तीन शेतकरी ठार
नाशिक : प्रतिनिधी
भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप आणि खासगी आराम बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन शेतकरी ठार झाल्याची घटना काल बोरगावजवळ घडली. बोरगावहून एमएच 41 ए.यू2192 ही पिकअप भाजीपाला भरुन नाशिक बाजार समितीत जात असताना चिखली गावाजवळ खासगी आराम बस आरजे27पीबी2658 यांच्यात धडक झाली. यात तीन शेतकर्यांचा जागीच मृत्यू झाला.
कैलास पंडीत दळवी (25, तताणी) पंढरीनाथ मुरलीधर भोये (55,शृंगारवाडी) नारायण पवार55, घागरबुडा, ता. सुरगाणा अशी अपघातात ठार झालेल्या शेतकर्यांची नावे आहेत. अपघातानंतर नातेवाइक आणि ग्रामस्थांनी गर्दी केली. लक्झरी बसचा चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. त्यामुळे गर्दी झाली होती.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…