वृक्षप्रेमींकडून विरोध होण्याची शक्यता
नाशिक : प्रतिनिधी
जुन्या जलवाहिनीची वारंवार गळती होत असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागत असल्याने शहराला नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 12.5 किलोमीटर लांबीची थेट जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. दरम्यान, गंगापूरहून पाइपलाइनच्या कामात सातपूर व पश्चिम विभागात तब्बल तीनशेहून अधिक झाडे येत असल्याने त्यांवर कुर्हाड चालवली जाणार आहे. परंतु या वृक्षतोडीला वृक्षप्रेमींकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सदर काम हे होत आहे. या प्रकल्पासाठी 204 कोटी 38 लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. आर्थिक स्थिती नसल्याने महापालिकेने या प्रकल्पासाठी केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगाकडे निधीची मागणी केली होती. आयोगाने महापालिकेच्या या प्रस्तावाला मंजुरीही दिली आहे. त्यानंतर या प्रकल्पासाठी 204 कोटी 38 लाखांचा खर्चाचा प्रस्ताव तांत्रिक छाननीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला सादर करण्यात आला होता. सद्य:स्थितीत नाशिकची लोकसंख्या अंदाजे 21 लाख आहे. मात्र, या योजनेमुळे 2055 पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. कंपनीकडून दोन वर्षांच्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. त्यामुळे सिंहस्थ मेळ्यापूर्वीच या योजनेचा वापर नाशिककरांना करता येणार आहे. त्यामुळे सिंहस्थातही अतिरिक्त पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते. यासाठी 1997 ते 2000 दरम्यान 1200 मिमी व्यासाच्या दोन सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या.
2021 पर्यंतच्या अंदाजित लोकसंख्येला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने या थेट जलवाहिनीची रचना करण्यात आली होती.
गेल्या 23 वर्षांत या जलवाहिनीची वहनक्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून, सद्य:स्थितीत ही जलवाहिनी सक्षम नाही. गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान 425 एमएलडी क्षमतेची नवी लोखंडी जलवाहिनी टाकली जात आहे.
नाशिक ः प्रतिनिधी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे होणार्या गोदावरी महाआरतीस…
नाशिक ः प्रतिनिधी इयत्ता दहावीचा राज्य शिक्षण मंडळासह सीबीएसईचाही निकाल जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचा…
सुदाम डेमसे यांच्या मध्यस्थीने तत्काळ कार्यवाही सिडको : विशेष प्रतिनिधी प्रभाग 31 पाथर्डी परिसरात झालेल्या…
जि. प. सीईओ मित्तल : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण, तलावांतून…
सिडको : चेतनानगरमधील बाजीराव आव्हाड चौक परिसरात पार्क केलेल्या क्रेटा गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्याने…
‘श्री शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो?’ या विषयावर त्यांनी केले भाष्य नाशिक : प्रतिनिधी शिवछत्रपतींच्या चरित्राकडे…