महामार्गाच्या कामामुळे घटना; कारचे नुकसान
मुकणे : प्रतिनिधी
मुंबईकडून नाशिककडे रात्री सव्वादोनच्या सुमारा जाणार्या सियाज कार (एमएच 15, एफएफ 0569) महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा अंदाज न आल्याने पाडळी फाट्याजवळ खड्ड्यात जाऊन आदळली. कारने तीन पलट्या घेतल्याने तीन जणांना गंभीर दुखापत झाली. कारचाही चक्काचूर झाला.
घटनेचे वृत्त समजताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी झालेले विनायक विष्णू गांगुर्डे (वय 22), आदित्य नीलेश लायले (वय 21, रा. नाशिक, स्मित समीर माघाय (वय 32, रा. लासलगाव) यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, महामार्गाच्या सुरू असलेल्या कामालगत कोणतेही सूचनाफलक, दिशादर्शक किंवा उपाययोजना केलेली नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. यावर संबंधित काम करणारी यंत्रणा किंवा संबंधित राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाचे लक्ष नसल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…