नाशिक

राहुड घाटात दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी

ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरला धडक; ट्रकला लागली आग

चांदवड (वार्ताहर) :
मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाट रविवारी (दि. 22) अपघातांच्या घटनांनी हादरला. घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने पुढे जाणार्‍या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने तिघे जण जखमी झाले. याचदरम्यान राहुड गावाजवळ आणखी एका ट्रकला आग लागल्याने महामार्गावरील वाहतूकदारांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणार्‍या ट्रकचे (एमएच 20 ईएल 9710) राहुड घाटातील मारुती मंदिराजवळ अचानक ब्रेक निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे जात असलेल्या कंटेनरला (एमएच 04 एलई 8312) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तिघे जखमी झाले असून, त्यात मोहम्मद अन्सारी (रा. धुळे) आणि राजा बांबू प्रेमसिंग (रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज यांच्या मोफत रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, राहुड गावाजवळ दुसर्‍या एका ट्रकला (एमपी 09 एचएच 5792) अचानक आग लागली. आगीचे कारण समजू शकले नसून, यामुळे महामार्गावर काही काळ गोंधळ उडाला होता. राहुड घाटातील अवघड वळणे व वारंवार होणार्‍या अपघातांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस दोन्ही घटनांचा पुढील तपास करीत आहेत.

Three injured in collision between two trucks in Rahud Ghat

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

महापौरांच्या प्रभागातील 29 कामांसाठी बांधकाम विभागाला हवीय एनओसी

मनपाची यंत्रणा असतानाही बांधकाम विभागावर भरोसा नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेचा स्वतंत्र बांधकाम विभाग आणि…

1 minute ago

इराणने जगाला दिला धक्का; भूमिगत ‘मिसाइल सिटी’चे प्रदर्शन

एकाच वेळी दोन द्रव इंधन क्षेपणास्त्रे डागू शकणार्‍या नव्या ड्युअल मिसाइल लॉन्चरचे अनावरण तेहरान :…

54 minutes ago

पन्नास कोटी लोक गरिबीतून बाहेर

पंतप्रधान मोदींचा गुजरातमधील भाजप मेळाव्यात दावा नवी दिल्ली : गेल्या बारा-तेरा वर्षांत भारतातील सुमारे 50…

58 minutes ago

धुळ्याच्या नऊ भाविकांवर काळाचा घाला

खाटू श्यामजीच्या दर्शनावरून परतताना अपघात, मृत एकाच कुटुंबातील जयपूर/नवी दिल्ली : प्रतिनिधी देशासाठी 24 तासांचा…

1 hour ago

सीबीएसला महाराजांच्या पुतळ्याजवळ पाच हजार दीप प्रज्वलन

नाशिक : राजमुद्रा फाउंडेशनतर्फे सीबीएस परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक पणती शिवरायांसाठी हा सिंहस्थ…

1 hour ago

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

2 days ago