महाराष्ट्र

धुळ्याच्या नऊ भाविकांवर काळाचा घाला

खाटू श्यामजीच्या दर्शनावरून परतताना अपघात, मृत एकाच कुटुंबातील

जयपूर/नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशासाठी 24 तासांचा काळ जीवघेणा ठरला. राजस्थान, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांत अवघ्या काही तासांत सहा मोठे रस्ते अपघात झाले. त्यात 28 जणांचा मृत्यू झाला आणि 37 जण जखमी झाले. सर्वांत भीषण घटना राजस्थानच्या कोटा येथे घडली, जिथे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील पवार कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला, तर गुजरातच्या कच्छमध्ये उत्तराखंडच्या लष्करी कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
कोटा (राजस्थान) येथे पहाटे सुमारे 2 वाजता कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ भरधाव क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. यात सीकर जिल्ह्यातील खाटू श्यामजीचे दर्शन घेऊन धुळ्याकडे परतणार्‍या पवार कुटुंबातील 16 जणांपैकी 9 जण ठार झाले, तर 6 ते 8 जण जखमी झाले. चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कच्छ (गुजरात) येथे शनिवारी रात्री सुमारे 10 वाजता भुज-खावडा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रेलर ट्रकने कारला समोरासमोर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचे दोन तुकडे झाले. कच्छचे रण पाहून भूजला परतणार्‍या, भूजमध्ये तैनात असलेल्या लष्करी जवानांच्या कुटुंबातील सात जण, तसेच रिंकी नितीन गुसाई (वय 35) व त्यांची चार महिन्यांची मुलगी वामिका, सौरभ सिंह नेगी (30),त्यांच्या पत्नी सविता (30) व त्यांची 3 महिन्यांची मुलगी शिविका, राजेश रावत (35) व त्यांची 7 वर्षांची मुलगी रक्षिता जागीच ठार झाले. हे सर्व उत्तराखंडच्या गढवालचे रहिवासी होते.
जोधपूर / फलोदी (राजस्थान) – 3 ठार
शनिवारी संध्याकाळी भाविकांना घेऊन जाणार्‍या ट्रॅव्हल्स टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक झाली, त्यात 3 जण ठार झाले आणि 15 जण जखमी झाले, त्यांना मथुरादास माथूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जुनागड (गुजरात) – 3 ठार
केशोद-बालागाम रस्त्यावर खामीधाना गावाजवळ भरधाव कार दगडावर आदळून उलटली आणि तिला आग लागली, त्यात 3 जण जळून ठार झाले, चौथा प्रवासी जखमी झाला.
पाटणा (बिहार) – 4 ठार
रविवारी पहाटे सुमारे 4 वाजता बाढ उपविभागातील अथमलगोला पोलीस ठाणे हद्दीतील साबनिमा पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकने स्कॉर्पिओ कारला धडक दिली, त्यात तीन महिलांसह 4 जण ठार झाले.
फतेहपूर (उत्तर प्रदेश) – 2 ठार
पहाटे सुमारे 3 वाजता कानपूर-प्रयागराज महामार्गावर गाझियाबादहून वाराणसीला जाणार्‍या पर्यटक बसची बटाट्यांनी भरलेल्या ट्रकशी धडक झाली, त्यात बसचा वाहक आणि एक प्रवासी ठार झाले.
दरम्यान, राजस्थान व कच्छमधील दोन मोठ्या अपघातांबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त करत प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.

Tragedy strikes nine devotees from Dhule

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सीबीएसला महाराजांच्या पुतळ्याजवळ पाच हजार दीप प्रज्वलन

नाशिक : राजमुद्रा फाउंडेशनतर्फे सीबीएस परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक पणती शिवरायांसाठी हा सिंहस्थ…

6 minutes ago

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

2 days ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

2 days ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

2 days ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

2 days ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

2 days ago