नाशिक

तब्बल 17 महिन्यांनी तीन संशयितांना अटक

माळेदुमाला सोसायटी अपहार प्रकरण, 10 जूनपर्यंत कोठडी

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील माळेदुमाला सोसायटीत दोन कोटी 39 लाख 76 हजार 559 रुपयांचा अपहार केल्याच्या संशयावरून शासकीय लेखापरीक्षकांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यात तब्बल सतरा महिन्यांनंतर तीन संशयितांना अटक केली. न्यायालयाने संशयितांना 10 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली.

डिसेंबर 2023 मध्ये वणी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार 16 वर्षांमध्ये सभासदांनी परत केलेल्या कर्जाची सोसायटी दप्तरी नोंद न करता कर्जवसुली झाल्याचा दाखला दिला व दोन कोटी 39 लाख 76 हजार 559 रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद शासकीय लेखा परीक्षक विष्णू वारुंगसे यांनी वणी पोलिसांत दिली होती. तीन संशयितांविरोधात फसवणूक, विश्वासघात व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी संस्थेचे सचिव दत्तात्रय परशराम कोरडे (रा. टेकाडीपाडा, वणी, ता. दिडोरी), जिल्हा बँकेचे तत्कालीन अधिकारी बाजीराव नारायण भदाणे (रा. बेलबारे, ता. कळवण) व किशोर अशोक गांगुर्डे (रा. वणी) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी संशयितांना अटक करणे क्रमप्राप्त होते; परंतु तसे झाले नाही. अपहाराची रक्कम जास्त असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा हस्तांतरित केला होता. विशेष बाब म्हणजे तब्बल सतरा महिन्यांनंतरही संशयित मोकळे होते.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित केली असता माळे दुमाला सोसायटीत अपहाराचा गुन्हा दाखल होता. मात्र तीन संशयितांना अटक नसल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना माहिती देताच त्यांच्या आदेशानुसार तातडीने तिघा संशयितांना चौकशीकामी सुर्वे यांनी कार्यालयात बोलावले. गुन्ह्यात संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दत्तात्रय कोरडे, बाजीराव भदाणे व किशोर गांगुर्डे यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. दरम्यान, संशयिताना न्यायालयासमोर उभे केले असता दहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तब्बल सतरा महिन्यांनंतर संशयिताना अटक केल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.

 

Gavkari Admin

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

2 days ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

4 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

4 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

4 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

4 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

5 days ago