मालेगाव : येथील राष्ट्रीय महामार्गावरील फाउंटन हॉटेलजवळ रविवारी (दि. 8) दुपारी साडेतीनच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात बसचालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार पिंपळगाव आगाराची बस (एमएच 14 बीटी 3327) नाशिकहून मालेगावकडे येत होती. यावेळी ट्रक (आरजे 11 जीसी 3608) फाउंटन हॉटेलसमोरील महामार्गावर अचानक दुभाजक ओलांडत असताना समोरासमोर बसला जोरात धडक दिली. अपघाताचा आवाज होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले. बसमधील जखमींना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील रुग्णालयात हलवले. अपघात इतका भीषण होता की बस आणि ट्रक चालकाच्या केबीनचा चक्काचूर झाला. अपघातात बसचालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, महामार्गावरील दुभाजकाजवळ अनेक वाहनचालक अयोग्य पद्धतीने वाहने चालवत असल्याने अपघात वाढ होत आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…