मनोरंजन

जागतिक पुरस्कार विजेता, नक्की बघावा असा चित्रपट तिन्हीसांजा

जागतिक पुरस्कार विजेता, नक्की बघावा असा चित्रपट तिन्हीसांजा

मुंबई : तिन्हीसांजेच्या वेळेला अत्यंत शुभ आणि चांगलेच बोलावे, अपशब्द अजिबात बोलू नयेत असे संस्कार भारतीय कुटुंबात नक्कीच झालेले असतात. अदृश्य शक्ती किंवा वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो. आणि जे बोलाल ते खरे ठरते अशी आपली समजूत असते. मुलांनी संध्याकाळी घरी येऊन प्रार्थना म्हणावी ही आपली संस्कृती आहे. तिन्हीसांजा म्हणजे अशी एक वेळ असते की शरीर आणि मन दिवसभराच्या कष्टाने थकलेले असते. दिवसाचा प्रखर प्रकाश नाही आणि रात्रीचा अंधार पण नाही अशा प्रकाशाला इंग्रजीत ढुळश्रळसहीं म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील अशी अवस्था येते. त्याची तुलना तिन्हीसांजेशी करता येते. अशीच एक स्त्री नायिका आपल्या आयुष्याच्या या विचित्र स्थितीतून जात असते. ती आपण मनोरुग्ण आहोत हे कधीही मान्य करीत नाही. मनाचे लहान लहान आजार असतात जे पुढे वाढत जातात. एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही, ती आपल्याला कधीच मिळणार नाही, मग काय करायचे? अशा वेळेला एखादी स्त्री आपला स्वतःचा मार्ग निवडते. ती गोष्ट आपल्याकडे आहेच अशी समजूत करून घेऊन ती त्यात रममाण होते. जर्मनीतील मंचहाऊझेन या मानसोपचार तज्ञाने यावर संशोधन केले आहे. अशा स्त्रीयांना हे समजतच नाही की त्या मानसिक आजाराने पछाडलेल्या आहेत.या आगामी मराठी चित्रपटातील नायिका अशाच एका सिंड्रोम मधून जात असते. संगीता शरद टेंभेकर यांचा तिन्हीसांजा हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होतोय.मेघा विश्वास या सशक्त अभिनय करणार्‍या अभिनेत्रीने जगातील अनेक देशातून वाहवा मिळवली आहे.स्त्रीची ही मानसिक समस्या जगातील सर्व देशात आढळत असल्याने 24 अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाची निवड झाली. यामध्ये उत्कृष्ठ लेखन, उत्कृष्ठ दिग्दर्शन, छायाचित्रण व सर्वश्रेष्ठ चित्रपट असे पुरस्कार देखील मिळाले आहेत. प्रत्येक स्त्रीने बघावा असाच आहे हा चित्रपट. चित्रपटाचे दिग्दर्शन उल्हास आढाव यांचे तर छायाचित्रण कुमार डोंगरे यांचे आहे. मेघा विश्वास, अभिजित रहाणे, मुकेश गायकवाड, आरती तरडे चव्हाण, नीला इनामदार, शैलेश देशमुख, अविनाश ओगले, सुनील चौधरी यांच्यासहबालकलाकार अवनी मत्स्ये प्रमुख भूमिकेत दिसतील. सोबत सैशा ठोंबरे, रितू शेल्डेकर, विवान बोकील, शर्वरी पोळ,यांच्या देखील भूमिका आहेत. या चित्रपटात दिनेश पवार सहदिग्दर्शक तर गिरीश वळवी, साहिल पाठक, गिरीश सांगळे व शरद हुकेरी सहाय्यक दिग्दर्शक आहेत. गीते मंदार भाटे तर संगीत सलील मोहन यांचे आहे. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर व पूर्वा बाम यांनी या चित्रपटातील सुश्राव्य गीते गायली आहेत. चित्रपटाचे संकलक मधुकर गवंडी आहेत, डॉ. चंद्रशेखर जोशी कलाकार समन्वयक, तर चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख राम परसैय्या आहेत. नृत्य दिग्दर्शन ऋषिकेश सणस ांचे आहे. चित्रीकरणासाठी पुण्यातील कुर्‍हाडे, सचिन भामरे, हुकेरी, सरोज जैन यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. औरंगाबाद येथील राज्य पुरस्कार विजेते डॉ. यशवंत देशपांडे हे या चित्रपटाचे लेखक असून विभावरी चित्र संस्थेची ही निर्मिती आहे. दि. 7 ऑक्टोबर रोजी अलका (पुणे), वैशाली (बदलापूर), ए. एम. मल्टीप्लेक्स (नागपूर), प्रभात (गोंदिया), मोहन-नोव्हा (औरंगाबाद), प्रभात (कराड), राजेश (अमरावती), रॉयल (कोल्हापूर), ज्ञानेश्वर (राहुरी), आशा (अहमदनगर) येथे एकाच वेळी हा चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती चित्रपट वितरक संगीता टेंभेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Bhagwat Udavant

Recent Posts

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

7 hours ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

10 hours ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

10 hours ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

10 hours ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

10 hours ago

अवघ्या एक रुपयासाठी गमावले प्राण, नेमकी काय घडली घटना?

सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…

1 day ago