तो जेव्हा ती होते..
सविता दरेकर
एक दिवस संध्याकाळी श्रीधर घरी आले… आणि, आईकडे रितसर दिपीकाला लग्नासाठी मागणी घातली….
त्यांची पत्नी देवाघरी गेली होती. एकच मुलगी होती. ती नुकतच लग्न होऊन सासरी गेली होती…
दिपीका मला फोनवर सर्व सांगत राहीली मी तसतसं लेखनातून तिचं भावविश्व उतरवत गेले! दिपीका बोलत होती…
ताई , तुला सांगते मी खूप विचारात पडले…
कसं शक्य आहे हे तूच सांगणा गं .. एवढी मोठी सन्मानित व्यक्ती माझ्याशी लग्न करायची मागणी करते.. ही माझ्या कुटुंबासाठी मोठी आनंदाची गोष्ट होती…!
पण मी नकार दिला… श्रीधर नी कारण विचारले., मी सांगितले, कि माझ्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा खराब होईन..हे मला नाही पटत…!
ते म्हणाले,, मी लोकांचा विचार करत नाही,,दिपीका मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि लग्न करुन तुला आयुष्यभर सुखी ठेवेन…
मनातून मीही श्रीधरवर प्रेम करत होते.. तरीही मी नकार दिला…आणि विषय थांबला..
पुढे काही दिवसांनी अचानक एक दिवस खूप पाऊस झाला.. सर्वत्र पूराचे पाणी साचले, माझ्या घरी जायचा रस्ता पाण्याखाली गेला.. मी डान्स क्लासच्या हॉलमधे अडकले होते.. श्रीधर मला त्यांच्या घरी घेऊन गेले.. तिकडे पाणी कमी होते…नाईलाजाने मी गेले… आईला फोनवर कळवले मी सुरक्षित आहे श्रीधरच्या घरी..!
घरात आल्याबरोबर श्रीधर ने मला त्यांच्या पत्नीची साडी कपडे दिले…सतत पाऊस सर्वत्र पाणीच पाणी यामुळे पुर्ण ओले झालो होतो..
चेंज करुन मी लगेच स्वयंपाक बनवला.. कारण बाहेरुन जेवन मागवायला काही मार्गच नव्हता.. श्रीधर ने स्वयंपाकाचे खूपच कौतुक केले…
क्षणभर मला पत्नीचा रोल फिल झाला..
श्रीधरने परत विचारले अजुनही लग्नाचा विचार कर…
मोठं आयुष्य पडलय दिपीका तुझ्या पुढे एकटी कसं जगणार.. मलाही सोबत हवीय तुझी…
प्रेम फक्त शरीराने नसते करायचे… मनानेही मनावर करता येते.. तीच खरी सोबत असते…शांत विचार करुन कळव.. झोप आता सकाळी घरी सोडवतो तुला .. गुड नाईट..
मी रात्रभर विचार करुन अखेर सकाळी घरी गेल्यावर आईला होकार देत निर्णय सांगितला.. सगळे खुप आनंदी झाले..
पण आता खरी अडचन आली होती.. माझं उमाशी झालेले लग्न आड आले.. ती चोरी करुन पळून गेल्याने आमचा डिवोर्स नव्हता झाला.. त्यासाठी मी तिला बंगलोरला फोन करून बोलवले.. ती तिच्या प्रियकरासोबत संसार करत होती.. ती आली पण डिवोर्स देण्यासाठी खूप नाटकं केले मला घाण घाण बोलली… शेवटी श्रीधरने तिला यासाठी पैसे भरले… तिच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी मदत होईल म्हणून… मग तिने अखेर पेपरवर्क वर सह्या केल्या आणि माझी उमा पासुन सुटका झाली… (पण आज उमाच्या आईकडे मीच लक्ष देते सांभाळते… तिची आई एकटीच रहाते… कुणी सांभाळत नाही.. मुलगा परदेशात असतो… मी माझं कर्तव्य करते, बस्… असो… )
मग थोड्याच दिवसात मला हळद लागली..लॉकडाऊन काळात मोजक्या पाहुण्या समोर मंदिरात आमचे लग्न झाले..
आणि मी श्रीधरची पत्नी होऊन गृहप्रवेश केला.. माझा संसार सुरु झाला आनंद प्रेमाने बहरला ही… पण मला स्वतःला न्याय द्यायचा होता.. डिपेंड न रहाता स्व:कमाईसाठी मी माझे अलिशान पार्लर सुरु केले .. कथ्थक भरतनाट्यम क्लास सुरुच ठेवले…
आईची बहीणीची माझ्याविषयीची चिंता मिटली होती..पण एक दिवस श्रीधर मला त्यांच्या मावशीच्या गावी घेऊन गेले.. खूप थाटात स्वागत केले.. माझी ओटी भरली…
पण जेव्हा सासुबाई ला नंनदेला कळले कि मी आई नाही होवू शकत …. तेव्हा सत्य ऐकून मला अपमानास्पद वागणूक मिळाली… मी घरी आईकडे परत आले… काही दिवसात सासुमावशीचा राग निवळला…
श्रीधरने नंतर समजवले सारे व मला घरी घेऊन गेले.. आता मी सुखात आहे.. श्रीधरच्या पहील्या मुलीला मुलगी झालीय तिचे बाळंतपण मीच केले .खूप काळजी घेतली त्यामुळे माझ्या स्रित्वाला आईपण मिळाले.. आमचे मायलेकीचे छान जमते आता…
सविता ताई, तू माझा आवाज तुझ्या शब्दातून समाजापर्यंत पोहचवला यासाठी खूप धन्यवाद गं… असेच ऋणानुबंध जपत राहू गं… तुझे सारे स्वप्न, ध्येय पूर्ण होतील..! ( मनापासून धन्यवाद दिपीका )
पण जाता जाता आनंदाची अजुन एक गोष्ट सांगते.. काही दिवसांपूर्वी माझ्या कॉलेजच्या मैत्रीणी मला सहलीला घेऊन गेल्या…
एके काळी मला दिपक म्हणून ओळखणार्या सख्या आज दिपीकाला मैत्रीण म्हणून भरभरून सुखदुःख शेयर करत होत्या…
खूप धमाल मस्ती केली आम्ही.. आणि आनंदाचा खजिना ह्दयात भरून घरी आले…
गळ्यात मंगळसूत्र, साडी गजरा, बांगड्या घालून माझ्या आयुष्यात दिपक मधल्या दिपीकाच्या स्रीत्वाला खरा न्याय मिळाला…
फक्त आता एकच मागणं आहे…
समाजात आमच्या सारख्या किन्नर बायकांनाही समस्त स्रीयांनी स्री म्हणून आदराने बघावंतेव्हाच हा लढा, हा प्रश्न संपेल! आणि तेव्हाच जाणवेल कि,
सुख म्हणजे यापेक्षा अजुन काय हवं..!
(लेखमाला समाप्त)
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…