संपादकीय

आजचा दिवस आणि आत्ताचा क्षण

– सुप्रिया सुरवाडे
आपल्या हातात फक्त आजचा दिवस आणि आत्ताचा क्षण आहे…सहज वाचनात आलेल्या वाक्य मात्र
अर्थ फार मोठा आहे बरं…जीवनाच्या रहाटगाडग्यात एक एक दिवस येतो-जातो, आपल्याकडे याचा हिशोब नसतो…काही दिवस अगदीच आनंदात, काही दिवस दुःखात, काही दिवस अगदीच आपल्या मनासारखे तर काही दिवस अनेक अडचणींचे अस आपलं सुरू असतं… परंतु या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट मुख्य आहे ती म्हणजे वेळ….
येणारा प्रत्येक दिवस आपल्याला चोवीस तास देत असतो.. या वेळेचा आपण किती तंतोतंत उपयोग करतो किंवा किती क्षण आपण जगतो, किती क्षण आपण व्यर्थ घालवतो, हा लेखा जोखा करू लागल्यावर समजते की,आपण वेळ- प्रत्येक क्षण जगण्यापेक्षा किती तरी वेळ रिकामा घालवत असतो.. आता सुरुवातीला जे वाक्य आपण पाहिलं ते वाक्य आपल्याला काय सांगत?… आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे या एका दिवसामध्ये मी व्यवस्थित नियोजन केल, तर तो दिवस मी अगदी आनंदाने व्यतीत करू शकतो किंवा शकते आणि जर योग्य नियोजन नाही केलं तर तो दिवस भल्या मोठ्या डोंगरासारखा आपल्याला वाटू शकतो.. अगदी न पार करता येणारा.. आप ठरवतो की मला या दिवशी हे काम पूर्ण करायचं आहे, परंतु ते काम त्या दिवशी पूर्ण झाले नाही आणि दिवस संपून गेला तर …?….आपण स्वतःला दोष देतो किंवा हळहळ व्यक्त करतो किंवा मनाला फार मोठी हुरहुर लागते काहीतरी चुकल्यासारखं वाटतं हे का..? तर आलेला तो दिवस, आपल्या हातातून निघून गेला, त्यात मिळणारे जे काही तास होते, जे काही मिनिट होते, जितके सेकंद होते, त्याचा योग्य उपयोग आपल्याला करता आला नाही.. जे आपण साध्य ठरवलेलं होतं ते करता आलं नाही… आता गेलेला दिवस तो तर भूतकाळामध्ये जमा झाला, तो आपण पुन्हा आणू शकत नाही किंवा गेलेले क्षण ते आता भूतपूर्व जमा झालेत त्यातील एकही क्षण आपल्याला उधार मिळणार नाही, एकंदर सांगण्याचा प्रयत्न हा आहे की आपल्या हातात असलेला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक नवीन संधी असते आणि त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं आणि ते करायलाच हवं…
बालपण असो किंवा कॉलेजचं वर्ष असो त्यात असणारे मित्र-मैत्रिणी असो किंवा आजूबाजूचे नातेवाईक असो त्या त्या वेळी आपण ते क्षण,त्या आठवणी जगलेलो नसू तर पुढे येणारा वर्तमान आहे, त्यामध्ये ते क्षण आठवत जातात आणि असं वाटतं की थोडं जगणं राहूनच गेलं.. तो काळ सुंदर होता त्यात किती काय करायला हवं होतं, पण मी ते केलं नाही, ही खंत नंतर होते त्याचा परिणाम असा होतो की वर्तमान क्षणांमध्येसुद्धा आपण असणार्‍या गोष्टींचा आनंद घ्यायचा सोडून, भूतकाळात मी काय केलं नाही किंवा कसं मला जगता आलं नाही याचा विचार करून दुःखी होत असतो… म्हणजे गेलेली वेळ, गेलेले क्षण, गेलेले दिवस हातातून तर निसटलेच पण वर्तमान स्थितीमध्ये असणारे चांगले आनंदाचे क्षण,आप्तेष्टांसोबत जगणं हे सर्व जगणं आपण विसरतो आणि असलेला वर्तमान सुद्धा त्या गेलेल्या भूतकाळासारखाच घालवतो, म्हणून गेलेल्या भूतकाळाचा, या सर्व गोष्टींचा विचार करत बसून वर्तमान बिघडवून घेण्यापेक्षा, वर्तमानमध्ये तीच चूक पुन्हा माझ्याकडून घडणार नाही ही ग्वाही स्वतःला देऊन,आत्ता ज्या क्षणामध्ये आपण जगत आहोत, तो क्षण मला किती सुंदर बनवता येईल. यासाठीच तर आपल्या हातात आजचा दिवस आहे, तो दिवस आपल्या स्वतःच्याच पद्धतीने किती सुंदर आपल्याला जगता येईल, हा विचार आपण करूयात.. प्रत्येक क्षणाचा उत्सव करूयात .. गेलेल्या क्षणांपेक्षा हातात असलेला वर्तमान किती श्रेष्ठ आहे आणि तोच वर्तमान पुढे जाऊन आपलं भविष्य निर्धारित करणार आहे ही गोष्ट आपण विसरता कामा नये, वर्तमानावरच आपला भूतकाळ आणि आपला भविष्यकाळ आहे, म्हणून आपण ठरवायचं जगायचं कसं कण्हत कण्हत की गाणं म्हणत…

Today and this very moment

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago