नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे लाही लाही होत असताना आता दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे . भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , यावर्षी नैऋत्य मान्सून देशात वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो . अंदमान आणि निकोबार बेटांवर १५ मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता आहे . भारतीय हवामान विभागाच्या मते , नैऋत्य मान्सून १५ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे . हवामान शास्त्रज्ञांच्या मते , पूर्व मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून , मान्सून आधी केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल . केरळमध्ये मान्सून साधारणपणे १ जून रोजी दाखल होतो . परंतु , यंदा वेळेआधी म्हणजे २७ मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे . पोषक वातावरण राहिल्यास पुढच्या सात दिवसांत मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे . अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल , असा हवामान खात्याचा अंदाज आहे . १४ ते १६ मेदरम्यान द्वीपसमूहात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे . आज मान्सून अंदमानात दाखल १५ आणि १६ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रावर ४० ते ६० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे . दरम्यान , काही राज्यांमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे .
देशात ७० टक्के पाऊस
साधारणपणे मान्सूनची सुरुवात केरळपासून होते आणि नंतर तो हळूहळू देशभर पसरतो . त्यामुळे देशातील एकूण पावसापैकी ७० टक्के पाऊस नैऋत्य मान्सूनमधून पडतो . भारतातील निम्मी रब्बी पिके या मान्सूनवर अवलंबून आहेत .
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…