रविवार, १५ मे २०२२. वैशाख शुक्ल चतुर्दशी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

“आज प्रतिकूल दिवस आहे *पुष्टीपती विनायक जयंती* आहे” आज सकाळी ९.४८ पर्यंत व्यतिपात योग आहे. नंतर वरिया योग आहे.

चंद्र नक्षत्र – स्वाती

मेष:- प्रेमाच्या व्यक्तीवर खर्च कराल. जोडीदाराशी वाद संभवतात. अनपेक्षित घटना घडतील.

वृषभ:- उत्तम दिवस आहे. उत्साह वाढेल. ओळखीतून आर्थिक प्राप्ती होईल.

मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत. अंदाज चुकतील.

कर्क:- घरात शांतता राखा. क्रोध आवरा. शेजाऱ्यांशी वाद नकोत. हितशत्रू डोके वर काढतील.

सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील. मात्र सावधानता आवश्यक आहे.

कन्या:- कठोर बोलणे टाळा. कला आणि छंद यात रममाण व्हाल. एखादी कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकते.

तुळ:- फारशी अनुकूलता नाही. नेहमीची कामे चालू ठेवा. अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात.

वृश्चिक:- मान – अपमानाचे प्रसंग येतील. मन उदास राहील. आत्मविश्वास कमी होईल.

धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. मात्र काही अंदाज चुकतील. राजकीय भाष्य टाळा.

मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. मात्र अधिक जबाबदारी वाढेल. कामात चुका होऊ शकतात.

कुंभ:- प्रवासात अधिक काळजी घ्या. नुकसान संभवते. आध्यत्मिक प्रगती करणयास उत्तम काळ आहे.

मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. भावंड सुखद धक्का देतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

9 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

10 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

10 hours ago