नाशिक : दिलीपराज सोनार
आषाढी वारी 2026 निमित्त पंढरपूरकडे जाणार्या मानाच्या पालख्या, वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना राज्यातील विविध टोल नाक्यांवर पथकरातून (टोल) सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत 6 जुलै 2026 रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.
या निर्णयानुसार 29 जुलैपर्यंत पंढरपूरला जाणार्या तसेच परतीच्या प्रवासातील पालख्या, भाविक आणि वारकर्यांच्या हलक्या व जड वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे. यासाठी ‘आषाढी एकादशी 2026’ असा उल्लेख असलेले विशेष स्टिकर किंवा पास संबंधित पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत (आरटीओ) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखांना भाविकांच्या मागणीनुसार टोलमाफी पासचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पथकरमाफी नसलेल्या बसांनाही या कालावधीत टोलमाफी देण्यात येणार आहे. वारीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सर्व टोल नाक्यांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, ट्रॅफिक वॉर्डन आणि आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महामार्गांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हायवे सिक्युरिटी पॅट्रोलिंग (एचएसपी) यंत्रणाही सक्रिय राहणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह, मुंबई-कोल्हापूर-बेंंगळुरू, पुणे-सोलापूर आणि इतर प्रमुख महामार्गांवर रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था करण्याचे आदेशही शासनाने संबंधित विभागांना दिले आहेत.
आवश्यकतेनुसार जड वाहनांवर निर्बंध घालण्याबाबत परिवहन विभागाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
पंढरपूरकडे जाणार्या सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, दुरुस्ती करणे आणि दिशादर्शक फलक उभारण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.
विशेष जनजागृती
टोलमाफीमुळे संबंधित टोल कंत्राटदारांचे होणारे आर्थिक नुकसान राज्य शासनाकडून भरून काढण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस आणि आरटीओमार्फत वितरित करण्यात आलेल्या पासेसची माहिती संबंधित यंत्रणांना सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, पास सुविधा आणि त्याच्या उपलब्धतेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस व परिवहन विभागाकडून विशेष जनजागृती आणि प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
Toll waiver for devotees’ vehicles until July 29 for the Ashadhi Wari.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…