टोल नाका कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा ट्रकचालकाला भोवला

पिंपळगाव बसवंत: वार्ताहर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावी जाण्यास काही अवधी असताना पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर टोल कर्मचार्यांचा हलगर्जीपणा पहायला मिळाला. नाशिकहुन मालेगावच्या दिशेने जाणार्या हायवा ट्रकला अचानक बॅरीकेटस आडवे लावल्याने ट्रक त्यावर धडकला. यामध्ये हायवा ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी मालेगाव येथे जाणार होते. त्यांचा ताफा पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर येण्यास काही अवधी बाकी असतानाच पिंपळगाव टोल कर्मचार्यांचा मुजोरपणा बघायला मिळाला. राख घेऊन जाणारा हायवा ट्रक (क्र. एमएच १५- एचडब्ल्यू ५४९९) टोल नाक्यावर येत असताना समोरील कारने टोल न भरताच धूम ठोकली. त्या कारला अडविण्यासाठी टोल कर्मचार्यांनी बॅरिकेडस लेनवर आडवे लावले. मात्र, कार निघून गेली. तर पाठीमागून येणारा हायवा ट्रक बॅरिकेडस वर जाऊन आदळल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

19 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago