सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा शिंदे गटाला कोंडीत पकडणारा जोरदार युक्तिवाद
नवी दिल्ली : प्रतिनिधी
शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर बुधवारी (दि. 24) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या युक्तिवादाला उत्तर म्हणून प्रतियुक्तिवाद केला. कालच्या सुनावणीचा केंद्रबिंदू एकच होता, जे घडलं ते मतभेद होते की पक्षांतर? मूळ पक्ष कोणाचा होता, हे 21 जून 2022 ला ठरवायला हवे. तेव्हाच पक्षांतराची पहिली कृती झाली, असा आरोप आहे. निवडणूक आयोगाने नंतर दिलेली मान्यता, आधीच्या कृतीला मागून वैध ठरवू शकत नाही, हा मुद्दा सिब्बल यांनी ठासून मांडला.
विधानसभा अध्यक्षांनी आमदारांची संख्या पाहून शिंदे गटालाच मूळ शिवसेना ठरवले, ही घटनात्मक चूक आहे. विधिमंडळ पक्षाचे बहुमत म्हणजे राजकीय पक्ष नव्हे. दहाव्या अनुसूचीत अते रूपांतर होऊ शकत नाही, हेही सिब्बल यांनी कोर्टाला पुन्हा एकदा सांगितले.
सिब्बल यांचे आजचे सर्वांत चर्चेत आलेले विधान म्हणजे, मतभेद असेल तर पक्षाची बैठक बोलवा, चर्चा करा. त्याऐवजी तुम्ही म्हणता, मी तुम्हाला ओळखतच नाही, तुम्ही नेते नाहीत, मीच नेता आहे, माझाच व्हीप चालेल. हे मतभेद नाहीत, हे सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे. पक्षाने नेमलेला व्हीप बदलणे, स्वतःचा ठराव करणे, राज्यपालांना पत्र पाठवणे हीच कृती पक्षांतराचा पुरावा आहे, असे सिब्बल यांनी युक्तिवादात सांगितले. महाविकास आघाडीची विचारधारा मान्य नव्हती, या शिंदे गटाच्या दाव्याला उत्तर देताना सिब्बल यांनी 2019 मधील पहाटेच्या शपथविधीचा दाखला दिला.
त्यावेळी फडणवीस-अजित पवार यांची आधी युती कुठे होती, असा सवाल त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदेंसह अनेक जण मंत्री होते. विधान परिषद निवडणुकीच्या दुसर्या दिवसापासूनच त्यांना अचानक आघाडी चुकीची वाटायला लागली, असेही ते म्हणाले. अपात्रतेची याचिका वेळेत दाखल केली होती, तेव्हा ते सगळे आमदार होते, त्यामुळे ती आजही वैध आहे. अध्यक्षांनी वेळेत निर्णय घेतला असता, तर महाराष्ट्राचा इतिहास वेगळा राहिला असता, असे सिब्बल म्हणाले.
Toppling the government in the name of ‘differences of opinion’—this is nothing but defection!
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम- 2025 अंतर्गत कोणताही अधिकृत परवाना नसताना शहरात अवैधरीत्या…
पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार पुणे : प्रतिनिधी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्र. 4…
- सचिन अहिरराव नाशिक महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्त्यांवर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झालं. पण त्याआधी बरीच…
दुष्काळाच्या छायेत राज्य मंत्रिमंडळाचा दिलासादायक निर्णय मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…
- वासवदत्ता अग्निहोत्री चित्रपटात, नाटकात, जुन्या कथांमधून आपण हे बर्याच वेळेस ऐकलेय. अधिकारीवर्ग, दवंडी पिटून…
- सुजाता येवले पूर्वीच्या काळातले दिवे लागण्याच्या कातरवेळेला वातावरण आणि मन शुभ पवित्र, ऊर्जाभारित बनवणारे,…