वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा
नाशिकरोड, जेलरोड, पंचवटी, इंदिरानगर परिसरात काढल्या जाणार मिरवणुका; कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
पंचवटीत आरास-देखावे; वाहतुकीत बदल
पंचवटी परिसरात आरास, देखावे उभारण्यात येणार असून, शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच मिरवणूकदेखील काढण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड या भागात कार्यक्रम पार पडणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. बुधवारी (दि.18) दुपारी तीन वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत आणि गुरुवारी (दि.19) सकाळी 10 ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत पंचवटीतील मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग असा ः पेठ नाका, मखमलाबाद नाका, रामवाडीमार्गे पुढे हनुमानवाडी लिंकरोडने जुना गंगापूर नाक्याकडे वाहने मार्गस्थ होतील, तसेच आरास देखावे : या मार्गांवर प्रवेश बंद (दु. 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत) मालेगाव स्टॅण्ड-इंद्रकुंड-पंचवटी कारंजा-दिंडोरी नाक्यापर्यंत ये-जा करणार्या वाहनांना प्रवेश बंद. मिरवणूक मार्गावर प्रवेश बंद (सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत) दिंडोरी नाका ते मालेगाव स्टॅण्डपर्यंतचा रस्ता. गोदा पार्क कॉर्नर (बायजाबाईची छावणी) ते रामवाडी पुलापर्यंत येणारा रस्ता, मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टॅण्डपर्यंत दुतर्फा वाहतुकीला मनाई आहे.
नाशिक : प्रतिनिधी
शिवजयंती म्हणजे आपल्या लाडक्या राजाचा जन्मोत्सव सोहळा होय. शहरात शिवजयंतीनिमिताने गुरुवारी (दि. 19) नाशिकरोड, पंचवटी, पाथर्डी फाटा या उपनगरांमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहेत. यानिमित्ताने शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून याबाबत अधिसूचना मंगळवारी (दि.17) जारी केली आहे
या मार्गावर प्रवेशबंदी : (सकाळी 9 पासून) बिटको चौक, सिन्नर फाटा, वेगवान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे, उडाणपुलाखालील रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. तसेच जेलरोडकडे शिवाजी चौकातून जाणारा रस्ता आणि नांदूरनाक्याकडून बिटकोकडे येणारा रस्ता.
22 तारखेपर्यंत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकरोड- जेलरोडमधील भागात (दि. 22) शिवजन्मोत्सवानिमित्त बुधवार(दि. 18)पासून रविवारपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यामुळे दररोज सायंकाळी पाच वाजेपासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीला प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग असा :
नाशिकरोड बसस्थानक, रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी दत्त मंदिर सिग्नल येथून सुराणा चौक, आनंदनगरी टी पॉइंट, सत्कार टी पॉइंट या मार्गे ये-जा करतील. रेल्वेस्थानकाकडून सीबीएसकडे जाणार्या बसेस नाशिकरोड जुन्या कोर्ट समोरून सरळ आर्टिलरी सेंटर रोडने जयभवानी चौकातून पुढे उपनगर सिग्नलकडे मार्गस्थ होतील. पुण्याकडून नाशिककडे येणार्या व जाणार्या बसेस तसेच सर्व जड अवजड वाहने दत्त मंदिर सिग्नल येथून उड्डाणपुलाचा वापर करून पुढे मार्गस्थ होतील. नांदूरनाक्याकडे, नाशिककडे येणार्या व जाणार्या बसेस तसेच सर्व अवजड वाहने दत्तमंदिर सिग्नल येथून उडाणपुलाचा वापर करून पुढे मार्गस्थ होतील.
नांदूरनाक्याकडे जाणारी वाहने इंगळेनगर कॅनॉल रोडने नारायणबापूनगरमार्गे सकाळी एमटीपीसमोरून पुढे जातील. नांदूरनाका चौकाकडून बिटको चौकाकडे येणारी वाहतूक दसक पुलावरून एकेरी करण्यात
येणार आहे.
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…