इगतपुरी : प्रतिनिधी
मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात कंटेनरचा अपघात झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. या अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे येणार्या वाहनांची रांगच रांग लागली होती. महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. अपघातस्थळी महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राम व्होंडे व पोलीस पथकाने धाव घेऊन ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि. 26) मुंबईहून नाशिककडे येणारा कंटेनर हा सकाळी कसारा घाटामध्ये आला असता, अचानक बंद पडला. बंद पडून उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून येणारा कंटेनर आदळल्यामुळे कंटेनर रोडवर आडवा झाल्याने संपूर्ण कसारा घाट ठप्प झाला होता. अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे येणारी वाहतूक ही बंद झाली होती. इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड, महामार्ग सुरक्षा पोलीस व इतर प्रशासनाच्या अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जुन्या कसारा घाटातील वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली. यानंतर क्रेनच्या मदतीने आडवा झालेल्या कंटेनरला रस्त्यातून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, या अपघातामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…