सुधारित भाडेवाढीची अंमलबजावणी
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
प्रवासी रेल्वेसेवा दररचनेतील सुसूत्रता साधण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने प्रवास भाड्याच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुधारित दर रचना 1 जुलै 2025 पासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. सामान्य प्रवाशांना याची फारशी झळ बसणार नाही.
सामान्य प्रवाशांवर फारसा भार न येऊ देता ही भाडेवाढ करण्यात आली आहे. 500 किलोमीटरपर्यंत प्रवास करणार्या प्रवाशांसाठी कोणतीही भाडेवाढ नाही, हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तसेच उपनगरी रेल्वे सेवा व सीझन तिकीटधारकांनाही या दरवाढीचा फटका
बसणार नाही.
सुधारित दर 1 जुलैपासून खरेदी होणार्या तिकिटांवर लागू झाले. त्याआधी काढलेली तिकिटे मूळ दरांनुसारच
वैध राहतील.
रेल्वे प्रशासनाने पीआरएस, यूटीएस तसेच प्रत्यक्ष तिकीट खरेदी प्रणाली नव्या दरांसाठी अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय सर्व स्थानकांवर नवीन दरतक्ते लावण्याचे आदेशही रेल्वे मंत्रालयाने संबंधित विभागांना दिले आहेत. ही भाडेवाढ अत्यल्प असून, ती सामान्य प्रवाशांच्या खिशावर फारसा भार न टाकता, रेल्वेच्या सेवेला अधिक शाश्वत आणि आधुनिक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे रेल्वेने म्हटले आहे.
ही दरवाढ कोणत्या गाड्यांवर लागू होणार?
सुधारित भाडे हे राजधानी, शताब्दी, वंदे भारत, तेजस, दुरांतो, हमसफर, अमृत भारत, महामना, गतिमान, अंत्योदय, जनशताब्दी, युवा एक्स्प्रेस, एसी व्हिस्टाडोम, अनुभूती कोचेस तसेच सर्व सामान्य बिगर-उपनगरी गाड्यांवर लागू होईल.
इतर शुल्कात कोणताही बदल नाही :
आरक्षण शुल्क, वेगवान गाड्यांचा अधिभार, आणि पूरक शुल्क यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. शुल्क गोळाबेरीज विषयीचे नियमही पूर्ववत राहणार आहेत.
नव्या भाडेवाढीचे तपशील :
सामान्य बिगर वातानुकूलित वर्ग (दुसरा वर्ग) :
500 किमीपर्यंत कोणतीही वाढ नाही
501 ते 1500 किमी रुपये 5 वाढ
1501 ते 2500 किमी रुपये 10 वाढ
2501 ते 3000 किमी रुपये 15 वाढ.
शयनयान व प्रथम वर्ग (बिगर एसी) :
प्रत्येक किलोमीटरसाठी अर्धा पैसा भाडेवाढ, मेल/एक्स्प्रेस गाड्या (बिगर एसी):, दुसरा वर्ग, शयनयान, थर्ड क्लास – प्रत्येक किमीमागे 1 रुपये वाढ, वातानुकूलित (एसी) गाड्या : एसी चेअर कार, एसी 3 टायर, एसी फर्स्ट/एक्झिक्युटिव्ह – प्रत्येक किमीमागे 2 पैसे भाडेवाढ
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…
रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…
नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…
हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…