नाशिक

आदिवासी विकास विभागाकडून पात्र 40 जणांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दरवाजे उघडणार

नाशिक : प्रतिनिधी
अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे. या योजनेंंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 40 गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाईल. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण व परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक आकस्मिक/इतर खर्च, विमानप्रवास खर्च, व्हिसा शुल्क आणि आरोग्यविमा यांचा समावेश असणार आहे.
शैक्षणिक आकस्मिक/इतर खर्च यूएएस व इतर देशांसाठी (यूके वगळून) 1500 यूएस डॉलर, तर यूकेसाठी 1100 जीबीपी इतका दरवर्षी देण्यात येईल. लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाख रुपये, तसेच विद्यापीठांची क्यूस वर्ल्ड रँकिंग मर्यादा 200 च्या आत असणे बंधनकारक आहे. विहित निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाची उत्पन्नमर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत शिथिल केली जाईल. क्यूस वर्ल्ड रँकिंग मर्यादा 200 पासून पुढे चढत्या क्रमाने 300 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक टोफेल किंवा आयईएलटीएस यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांना
अनिवार्य आहे. शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील आवेदन हीींिीं://षी.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या अधिकृत संकेतस्थळावर भरणे अनिवार्य आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. निवड समितीद्वारे निकष पूर्ण करणार्‍या पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले.

योजनेचे पात्रता निकष
विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे, तर पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांंपर्यंत असावे.
टोफेल, आयईएलटीएस किंवा समकक्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे.

Tribal Development Department provides scholarships for higher education to 40 deserving people

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago