मालेगाव महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो शेख

मालेगाव महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो शेख

उपमहापौरपदी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद यांची निवड

मालेगाव: प्रतिनिधी

मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो शेख यांनी विजय मिळविला असून त्यांची महापौरपदाची निवड झाली आहे. त्यांनी शिवसेनेच्या लता घोडके यांचा २५ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद यांची निवड झाली.

महापौर पदासाठी एकूण तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. इस्लाम पक्षाकडून नसरीन शेख व ताहेरा शेख, तर शिवसेनेकडून लता घोडके यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काम पाहिले. यावेळी व्यासपीठावर आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव, नगरसचिव साजिद अहमद यांच्यासह उपायुक्त उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेनुसार सकाळी ११.१० ते ११.२५ या कालावधीत उमेदवारी माघारीसाठी वेळ देण्यात आला. या कालावधीत इस्लाम पक्षाच्या ताहेरा शेख यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर झालेल्या मतदानात शिवसेनेच्या लता घोडके यांना १८ मते मिळाली. भाजपाचे दोन्ही नगरसेवक तसेच एमआयएमचे २१ नगरसेवक तटस्थ राहिले. इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो शेख यांना ४३ मते मिळाल्याने त्यांनी २५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. अखेरीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नसरीन बानो शेख यांची मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड जाहीर केली.

दरम्यान, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे शान-ए-हिंद यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे निलेश काकडे यांचा २५ मतांनी पराभव केला.
उपमहापौर पदासाठी एकूण पाच उमेदवारांचे आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. निवडणूक प्रक्रियेनुसार उमेदवारी माघारीसाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. या कालावधीत समाजवादी पक्षाचे मुस्तकीम मोहम्मद मुस्तफा, शिवसेनेचे नरेंद्र सोनवणे तसेच एमआयएमचे हाफिज अब्दुल्ला यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

माघारीनंतर शिवसेनेचे निलेश काकडे व समाजवादी पक्षाचे शान-ए-हिंद यांच्यात थेट लढत झाली. झालेल्या मतदानात काकडे यांना १८ मते, तर शान-ए-हिंद यांना ४३ मते मिळाली. या निवडणुकीतही भाजपाचे दोन्ही नगरसेवक तसेच एमआयएमचे २१ नगरसेवक तटस्थ राहिले. अखेरीस समाजवादी पक्षाचे शान-ए-हिंद यांची मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी निवड जाहीर करण्यात आली.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

24 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

43 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

50 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

59 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago