राजीव गांधी भवन येथे भव्य मानवी साखळी; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
नाशिक : प्रतिनिधी
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या वतीने काल विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत राजीव गांधी भवन येथे भव्य मानवी साखळी आणि विशाल राष्ट्रध्वज झळकवण्याचा कार्यक्रम पार पडला.
या मानवी साखळीत नाशिक शहरातील विविध खासगी शाळा तसेच शिक्षण मंडळांतर्गत शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमस्थळी वंदे मातरम्, घर घर तिरंगा, भारत माता की जय या घोषणांनी देशभक्तीचा माहोल रंगला. कार्यक्रमाला कुंभमेळा आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्यासह मनपाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर यांनी आवाहन केले की, प्रत्येक नागरिकाने 15 ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवावा, राष्ट्रप्रेमाची जाणीव समाजात रुजवावी. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी राष्ट्रध्वजाच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून दिली आणि म्हटले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकविलेल्या राष्ट्रध्वजाचा गौरव आजच्या उत्साहातून पुनः अनुभवता येतो. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि एकजुटीचा संदेश देत प्रत्येकाने देशाविषयी आदर जोपासण्याचे आवाहन केले. या अभियानात उपआयुक्त अजित निकत, नितीन नेर, नितीन पवार, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, रवी बागूल, राजेंद्र शिंदे, डॉ. विजयकुमार देवकर, डॉ. अजिता साळुंखे, डॉ. जितेंद्र धनेश्वर, सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी सहभागी झाले. तिरंगा मानवी साखळी यशस्वीतेसाठी शंकरराव पोरजे, मनीषा पाटेकर, योगेश आडभाई, मोहन बुवा, संतोष चंद्रात्रे, सचिन बोरसे, संतोष कान्हे, मंगेश नवले, पवन वझरे, सुनील कदम, मनोज गायधनी, प्रल्हाद हंकारे यांनी
परिश्रम घेतले.
पाशा पटेल : साठवणुकीसाठी कार्यक्षम धोरणाची आवश्यकता लासलगाव : वार्ताहर साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान तब्बल 80…
पूर्वीपासून तिरळेपणाकडे एक विनोदाचा भाग म्हणून पाहिले जाते. त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो. आपण…
(भाग 8) आजच्या युगात तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे केले असले, तरी त्याचवेळी त्याने अनेक नव्या…
मॉकड्रील असल्याने प्रेस कामगारांनी सोडला सुटकेचा निःश्वास नाशिकरोड : वार्ताहर सायंकाळी प्रेस सुटण्याच्या दरम्यान अचानकपणे…
ना. उदय सामंतांची निमात घोषणा नाशिक : प्रतिनिधी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने त्यांच्या नूतन प्रकल्पासाठी…
पळाशी : वार्ताहर नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणातून चाळीसगाव औद्योगिक वसाहतीची तहान भागविण्यासाठी 1500 क्यूसेक पाण्याचा…