Categories: नाशिक

महाशिवरात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट सज्ज

व्हीआयपी प्रोटोकॉल, गर्भगृह दर्शनासह रविवारी देणगी दर्शनही दिवसभर बंद

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने महाशिवरात्रोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर वर्षभरात केवळ महाशिवरात्रीस रात्रभर खुले राहते. तसेच त्र्यंबकराजाची पालखी पूर्व संस्थानिक जोगळेकर यांच्या पाच आळी भागातील वाड्यावरून कुशावर्तावर जाते. यासह मंदिर प्रांगणात विविध कार्यकमांचे आयोजन होत असते. यासाठी मंदिर ट्रस्ट विश्वस्त मंडळाने वेळोवेळी बैठका घेऊन नियोजन केले आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने मंदिराला रासायनिक लेप लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी पहाड बांधण्यात आले आहे. त्यामुळे यंदा विद्युत रोषणाई करताना अडचण निर्माण झाली. तथापि ट्रस्टने यावर मार्ग काढला असून, मंदिरावर रंगीबेरंगी प्रकाशझोत सोडण्यात आले आहेत. विश्वस्त रूपाली भुतडा यांच्या संकल्पनेतून महाशिवरात्र हा शिवपार्वती विवाह सोहळा आहे व त्यासाठी तीन दिवसांचे नियोजन केले आहे. यामध्ये मेहंदी, हळदी आणि विवाह अशी पुष्प सजावट करणे यांसह लग्नघराचे वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर रविवारी (दि.15) सकाळी चारपासून सोमवारी (दि.16) रात्री नऊपर्यंत दर्शनार्थ खुले राहील.त्याकरिता पूर्व दरवाजा दर्शनबारी येथून दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल. भाविकांची श्री त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता सर्व प्रकारचे व्हीआयपी प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेे आहे. त्याचप्रमाणे रविवारी (दि. 15) देणगी दर्शनदेखील दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी (दि. 14) ते सोमवारी (दि. 16) सकाळी मंदिर उघडल्यापासून सकाळी साडेदहापर्यंत त्र्यंबकेश्वर येथील स्थानिकांनी पश्चिम द्वाराने ओळखपत्र (आधारकार्ड) दाखवून प्रवेश करून मंदिराच्या उत्तर द्वार (जाळीचा दरवाजा) येथून दर्शनासाठी प्रवेश करून दर्शन झाल्यावर मंदिराच्या दक्षिण गेट (गायत्री गेट) येथून बाहेर जावे. हा प्रवेश फक्त गावकर्‍यांनाच देण्यात येईल व त्यांच्या सोबत आलेले नातेवाईक अथवा पाहुणे यांना प्रवेश दिला जाणार नाही.
शनिवारी श्रीधर फडकेंचे गीतरामायण
महाशिवरात्रोत्सवानिमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे तीन दिवसांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यामध्ये शनिवारी (दि. 14) सायंकाळी सातपासून रात्री साडेनऊदरम्यान ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके यांच्या ‘गीतरामायण’चे आयोजन केले आहे. परंपरेनुसार रविवारी दुपारी तीनला श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघून पारंपरिक मार्गानुसार तीर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पूजा करून सायंकाळी पाचपर्यंत पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये
येणार आहे. पालखीदरम्यान शिव-तांडव ग्रुपतर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण मंदिरासमोर, मुख्य दोन चौकांमध्ये तसेच मंदिर पटांगणात आयोजित केला आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे रविवारी परंपरेप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी पाचला करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परंपरेनुसार महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त रात्री अकरापासून प्रभू श्री त्र्यंबकराजांची महापूजा तसेच अंतर्गत पालखी सोहळा आहे. सोमवारी सायंकाळी सहा ते सातदरम्यान प्रिया दीक्षित व ग्रुप, सात ते सव्वासात या वेळेत कलानंद कथक नृत्य संस्था, सव्वासात ते 7.20 या वेळेत कलाध्यास ग्रुप, 7.20 ते 7.30 या वेळेत ओवी पुरुषोत्तम कडलग व 7.30 ते 8.30 या वेळेत ओम नटराज अकॅडमी यांचे सांस्कृतिक कथक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

भाविकांसह ग्रामस्थांनी महाशिवरात्रोत्सवाचा आनंद घ्यावा व देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे. ग्रामस्थांसाठी दर्शनासाठी नियोजन हे फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
– पुरुषोत्तम कडलग, विश्वस्त,
त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट

Trimbakeshwar Temple Trust ready for Mahashivratri festival

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago