नाशिक

खंडित वीजपुरवठ्यामुळे सिन्नरकरांना आता दोन दिवसांआड पाणी

मुबलक साठा असूनही नागरिकांची पाण्यासाठी प्रतीक्षा; प्रशासनाचा कपातीचा निर्णय

सिन्नर : प्रतिनिधी
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कडवा धरणावरील पाणीपुरवठ्याच्या पंपिंग स्टेशनवर सातत्याने खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सिन्नर शहरात शनिवार(दि.14)पासून दिवसाआडऐवजी दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सिन्नर नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे. सध्या दिवसाआड पाऊण तास मिळणारे पाणी आता दोन दिवसांआड करण्यात आल्याने नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.

महिनाभरापासून कडवा धरण येथील योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरासाठी आवश्यक तेवढा पाणी उपसा होत नाही. पंपिंग स्टेशनला एक्स्प्रेस फीडरद्वारे वीजजोडणी असली तरी दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी, तीन ते चार तास उपसा पूर्णपणे ठप्प राहतो आणि दररोज सुमारे 25 ते 30 लाख लिटर पाण्याची तूट निर्माण होते. शहरात 18 हजारांहून अधिक नळजोडणीधारक असून, अनियमित पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही तूट भरून काढणे अशक्य झाल्याने प्रशासनाने पाणीपुरवठ्याची वारंवारता कमी करण्याचा निर्णय घेतला. धरणात पुरेसा साठा उपलब्ध असतानाही केवळ वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी शहरापर्यंत पोहोचत नाही. प्रत्यक्षात पाणी असूनही कपातीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने नियमित वीजपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कायमस्वरूपी तोडगा काढणार

योजनेला प्रारंभी साकूर फाटा येथील 33 केव्ही केंद्रातून वीजपुरवठा केला जात होता. नंतर दाब वाढवण्यासाठी खापराळे उपकेंद्रातून जोडणी देण्यात आली; मात्र बदलांनंतरही समस्या कायम आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात महावितरणकडे पत्रव्यवहार केला आहे. – विठ्ठलराजे उगले, नगराध्यक्ष

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago