नाशिक

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर 12 वर्षांनी आलेली शहर विकासाची संधी साधण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधींचा आराखडा तयार केला खरे; मात्र प्रत्यक्ष कामात दाखवलेल्या ओव्हर स्मार्ट धोरणामुळे त्र्यंबकनगरीतील रस्त्यांची पार दुर्दशा झाली आहे. पहिल्या टप्प्यात 39 कोटी आणि वाढीव 28 कोटी अशा एकूण 67 कोटींच्या भुयारी गटार योजनेचा गोंधळ अद्याप सुरूच असताना, आता नव्याने होत असलेल्या रस्त्यांच्या कामात या गटारी सर्वांत मोठा अडसर ठरत आहेत.
सिंहस्थाच्या नियोजनात अंतर्गत रस्त्यांवर जलवाहिनी, भुयारी गटार, वीज आणि फायबर केबल्स भूमिगत करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी काही अंतरावर चेंबर्स उभारण्यात आले आहेत. मात्र, वाहतळ ते त्र्यंबकेश्वर मंदिरादरम्यानच्या 100 मीटर रस्त्यावर प्रत्येक घर व दुकानासमोर दोन-तीन चेंबर्स उभे राहिल्याचे विचित्र चित्र आहे. रस्त्यांची उंची कमी करण्यासाठी खोदकाम केले खरे; परंतु आता चेंबर्सची पातळी गाठण्यासाठी रस्त्यांची उंची पुन्हा वाढवावी लागणार आहे.
स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि व्यावहारिक अडचणींचा विचार न करता कागदावर तयार केलेल्या आराखड्यातील त्रुटी आता स्पष्टपणे उघड्या पडल्या आहेत. शहरातील प्रवेशद्वार असलेल्या महादेवी रस्त्याचीही तीच अवस्था आहे. रस्ता तयार करायचा आणि पुन्हा तोडायचा, असा खेळ येथे सुरू आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून रस्ते खोदून ठेवल्याने स्थानिक नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. तर, पूजाविधी व दर्शनासाठी येणारे भाविक या अराजकतेमुळे भांबावून जात आहेत. “जर त्र्यंबकेश्वर शहरातील उर्वरित रस्तेही अशाच निकृष्ट पद्धतीने होणार असतील तर आम्हाला असा विकास नकोच!” असा थेट इशारा संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना दिला आहे.

ध्वजारोहण तोंडावर; कामे मात्र अपूर्ण

सिंहस्थ कुंभमेळा 2027 चे ध्वजारोहण अवघ्या तीन महिन्यांवर म्हणजेच 31 ऑक्टोबर 2026 रोजी होत आहे. तीर्थराज कुशावर्त आणि नव्याने बांधल्या जाणार्‍या घाटांवर सिंहस्थ ध्वज फडकल्यानंतर पर्वकाळाला सुरुवात होईल. पायलट प्रोजेक्ट म्हणून पाहिले गेलेले हे मुख्य रस्तेच चार महिन्यांपासून रखडले आहेत. पावसाने कामाची पोलखोल केल्यावर नागरिक व लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे भरपावसात घाईघाईने काम उरकण्याची धडपड प्रशासनाकडून सुरू आहे.

Trimbakeshwar’s roads mired in muck in the name of Simhastha.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago