त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
उपनगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर येथील नगरसेवकांत दोन गट पडले आहेत. त्यातून काल नगरसेवकांमधील दुहीचे जाहीर दर्शन घडले. विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या निषेधाचा फलक झळकवत नगराध्यक्षांच्या दालनालाच कुलूप ठोकल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.
शहरात सुरू असलेल्या प्रसाद योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी नाशिक मनपा नेते दिनकर पाटील यांना निमंत्रीत करण्यात आले होते.नगराध्यक्षांच्या लेटरहेडवर सत्तारूढ गटातील नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले होते.नगर पालिका सभागृहातील सर्व 19 सभासदांची यादी लेटरहेडवर होती.त्यापैकी शिवसेनेचे दोन सदस्य गटनेत्या मंगला आराधी, कल्पना लहांगे तसेच भाजपाचे स्वप्नील शेलार आणि शामराव गंगापुत्र यांच्या नावावर रेघ ओढत फुली मारली होती.त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका आराधी आणि लहांगे,भाजपाचे शेलार तसेच बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख सुरेश गंगापुत्र,भूषण अडसरे,कुणाल उगले,अशोक लहांगे,प्रशांत बागडे आदी एकत्र आले.त्यांनी नगराध्यक्षांचा निषेध नोंदवत फलक झळकवत त्यांच्या दालनाला कुलूप ठोकले. त्यानंतर पालिका कार्यालयाच्या पाय-यांवर ठिय्या मांडला. नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर,उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार,आरोग्य सभापती सागर उजे,नगरसेवक कैलास चोथे,विष्णु दोबाडे तेथे उपस्थित झाल्यानंतर आमच्या नावापुढे फुली का मारली, याचा जाब लहांगे, आराधी आणि शेलार यांनी विचारला.नगराध्यक्ष लोहगावकर यांनी हा भाजपा नेते दिनकर पाटील यांचा पाहणी दौरा होता.तो नगर पालिकेचा कार्यक्रम नव्हता असे सांगीतले मात्र आंदोलन करणा-या नगरसेवकांचे व त्यांच्या समर्थकांचे समाधान झाले नाही.दरम्यान याची माहीती पोलीस ठाण्याकडे कळवण्यात आली.काही वेळात तेथे पोलीस पोहचले आणि त्यांनी तो फलक हटवला.
दोन महिन्यांपूर्वी झालेली उपनगराध्यक्षांची निवडणूक यास कारणीभूत ठरली असून तेव्हा पासून नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत.भाजपाचे थेट नगराध्यक्ष आणि 14 सदस्य,शिवसेनेचे 2,अपक्ष 1 आणि भाजपाचे स्विकृत 2 असे सभागृहात बलाबल आहे.मात्र आता भाजपात दोन गट पडले आहेत.त्यांनी शिवसेनेच्या दोन सदस्यांच्या बाजूने उभे राहत नगराध्यक्षांच्या कारभारावर पक्षपाती कारभाराचा आरोप केला आहे.
नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…
नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…
चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…
पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको : विशेष प्रतिनिधी सरकार…
लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे…
अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…