वर्षभरात 101जणांचा मृत्यू, 55 हजार 949 जणांवर दंडात्मक कारवाई
नाशिक ः प्रतिनिधी
शहर आणि उपनगरातील विविध रस्त्यांवर दुचाकी स्वार विना हेल्मेट,ट्रीपलसीट सुसाट वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले आहे.रस्ता सुरक्षा सप्ताह,हेल्मेट सक्ती करूनही नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करणे टाळले जात आहेत.गेल्या वर्षभरात विना हेल्मेट आणि ट्रिपल सीट वाहनधारकांच्या युनीट 1 ते 4 येथील आकडेवारीतील एकूण 55हजार 949 केसेस मध्ये 2 कोटी 73 लाख 65 हजार इतका दंड करण्यात आला.101 जणांचा मृत्यू तर 329 जखमी झाले.
विना हेल्मेट च्या 53984 केसेसदवारे 2 कोटी 69 लाख 92हजार इतका दंड करण्यात आला.तर ट्रिपल सिट 1965 केसेस मध्ये तीन लाख 73 हजार इतक्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.वर्षभरात 101 जणांचा मृत्यू झाला तर 329 जखमी झालेल्यांचे प्रमाण जास्त आहे.
वाहन चालवितांना क्षमतेपेक्षा अधिक दुचाकीवर स्वार होणे,मोबाइल वर बोलणे,विना हेल्मेट सूसाट प्रवास करणे वेळ आणि पैसे वाचविण्याच्या नादात तरुणांमध्ये ट्रीपल सीट प्रवास करणे धोकेदायक ठरत आहेत.
शहरात रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.सेवाभावी संस्था आणि वाहतूक विभागातर्ङ्गे शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती राबविण्यात येते. रस्ते वाहतूकीचे नियमाबाबत माहिती देण्यात येते.समुपदेशन करण्यात येते.
कोरोना काळात रस्ते अपघातांचे प्रमाण घटले होते.शहरात एकूण 20 अपघात प्रवण क्षेत्र आहे.नागरिकांना वेळोवेळी वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन केले जाते.परंतु दंड किंवा कारवाईच्या भितीने तात्पुरते हेल्मेट वापरणे किंवा इतर नियमांचे पालन केले जाते. वाहतूक पोलिस वाहन अडविण्याच्या धास्तीने वाहनाचा वेग वाढविला जातो. रस्त्यावर होणारे अपघात हेल्मेट,ट्रीपल सीट वाहनधारकांमुळे अपघात होवून मृत्यूमृखी पडण्याचे प्रमाण वाढते आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे,जयंत नाईकनवरे यांनी हेल्मेट सक्तीबद्दल वारंवार उपक्रम राबविले होेते.नो हेल्मेट नो पेट्रोल उपक्रमास पेट्रोपपंप चालकांसह नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.अपघातामुळे मौल्यवान जीव गमावण्याची वेळ वाहतून नियमांचे पालन केल्यास येणार नाही.
हेल्मेट,ट्रिपल सिट वाहने चालविणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाद्वारे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.तसेच शहरातील विविध ठिकाणी हेल्मेट वापराबाबत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.वेगाची मर्यादा आणि सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटचा वापर केल्यास मुल्यवान जीव वाचू शकतो.
सिताराम गायकवाड
सहाय्यक पोलीस आयुक्त
वाहतूक शाखा
जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर
विना हेल्मेट
53984 केसेस
2कोटी 69लाख 92 हजार दंड
ट्रिपल सीट
1965 केसेस
3 लाख 73 हजार दंड .
.
गवंडगाव येथे चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन भाविकांनी यात्रात्सोवास येण्याचे मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वडनेरे यांचे…
सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून संशयित आरोपी फरार, पथकाकडून शोध सातपूर: प्रतिनिधी…
नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…
नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…
चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…
पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको : विशेष प्रतिनिधी सरकार…