सहा महिन्यात १ लाख ६४ हजार जणांना बुस्टर डोस
नाशिक : प्रतिनिधी
शासनाच्या निर्देशानुसार दि १५ जुलै पासून शहरात १८ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरीकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. शहरात पात्र असलेल्या १३ लाख ६३ हजार ७०० नागरिकांपैकी १ लाख ६४ हजार ३१६ लाभार्थ्यांनी मोफत बुस्टर डोसचा लाभ घेतला आहे.
कोरोनाचे अद्याप संकट शमलेले नाही. त्यामुळे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी बुस्टर डोस घ्यावा. नाशिक शहरात १३ लाख ६३ हजार ७०० नागरिक आहेत. त्यापैकी फ्रंट लाईन वर्कर आणि वय वर्ष ६० वरील नागरिकांनी पूर्वीच बुस्टर घेतला होता. १५ जुलै २०२२ पासून १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उर्वरित नागरिक मोफत बूस्टरसाठी पात्र आहेत. नाशिक महानगरपालिकेला कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. नागरिकांनी आपल्या घरा जवळील लसीकरण केंद्रात जाऊन बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय विभागाने केले आहे. शहरातील १९ कोविड लसीकरण केंद्र आहेत. यात कोव्हिशील्ड हे
पंचवटी मधील मायको पंचवटी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मखमलाबाद शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हिरावाडी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र नशिकरोड विभागात नाशिक रोड शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दसक पंचक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सिन्नर फाटा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय
सातपूर विभाग मायको सातपूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक पूर्व विभाग वडाळा गाव शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भारत नगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, एस जी एम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नाशिक पश्चिम विभाग बारा बंगला शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर सिडको विभागात स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी, पिंपळगाव खांब शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.
कोव्हॅक्सिनची येथे सोय
१) रेड क्रॉस शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
२) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय
३) झाकीर हुसेन रुग्णालय
४)मायको सातपूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
५)सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…