तुमची मुले काय करतात?

पालकांना उल्लू बनाविंग, सावध ऐका पुढल्या हाका
नाशिक ः देवयानी सोनार

पौगुंडावस्थेतील मुलांची मर्जी जपताना पालकांचा कस लागत असतो. शाळा, क्लासला मुलगा, मुलगी जात असतात. परंतु त्याची संगत कशी आहे, तो क्लासला जातो की त्या नावाखाली दुसरीकडेच भटकतो, मोबाइल वापरतो पण मोबाइलमध्ये काय पाहतो? याकडे पालक म्हणून कधी तुम्ही मुलाच्या अथवा मुलीच्या मोबाइलमध्ये डोकावून पाहिले का? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
स्वातंत्र्याच्या नावाखाली मुले-मुली काय करतात, याची माहिती किती पालक ठेवतात. मुलांचे मित्रपरिवार, सोशल मीडियावर काय सर्च करतात? पोस्ट काय करतात? शिक्षण, करिअरचे काय सुरू आहे, याची माहिती कती पालक ठेवतात किंवा किती मुले आपल्या आई-वडिलांशी मोकळेपणाने शेअर करतात, याबाबत पालकांना सजग होण्याची गरज आहे.
मुलांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितलीच पाहिजे, अशी पालकांची मानसिकता असते आणि मुलांना पालकांच्या प्रत्येक गोष्टीत सहभाग, हुकूम न आवडणारा असतो. आपण मोठे झालो आहोत. निर्णय घेण्यास सक्षम आहोत, अशीच मानसिकता मुलांमध्ये दिसून येत आहे. पालक मुलांचा हरवत चाललेला संवाद नुकत्याच घडलेल्या आफताब-श्रद्धा प्रकरण असो वा नामांकित महाविद्यालयात एकवीस वर्षीय मुलाने केलेली आत्महत्या मनाला चटका लावणारी आहे.त्यामुळे आपण आपल्या मुलांना किती ओळखतो. मुला-मुलींचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, त्यांचे ङ्गोन नंबर्स, मुले कुठे जातात, कोणाशी संपर्कात आहे, सोशल मीडियात काय पोस्ट करतात, याची माहिती पालकांना असते का? पालक रागावण्याच्या भीतीने मुले आपले सोशल अकाउंट पालकांना हाइड करून ठेवण्याची अनेक मुलांची मानसिकता असते.
खून किंवा आत्महत्यासारख्या घटना आपल्या मुलाच्या बाबतीत तर नाही ना घडू शकणार, असा विचार पालकांनी करण्याची वेळ आली आहे. मुलांशी संवादाचा पूल उभारणे गरजेचे आहे.
पालकांना मुलांचे शिक्षण, करिअर पुढे जाऊन लग्नातही त्यांच्या मर्जीने निर्णय घ्यावे, अशीच मानसिकता असते. एका दृष्टीने काहीअंशी बरोबरही असावे. ज्या वयात मुलांना समज नसते अशा वेळी पालकच अनुभवी असल्याने मुलांचा कल पाहून शिक्षण, करिअरच्या वाटा निवडताना दिसतात. शिक्षणातील स्पर्धा, करिअर, नोकरीच्या अत्यल्प संधी या सर्व गोष्टींचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.
क्वालिटी टाइम देणे गरजेचे
पालकांना नोकरी-व्यवसायानिमित्त मुलांना वेळ देण्याचा अभाव. आर्थिक, शैक्षणिक चढाओढीमुळे अवाजवी ताण, मुलांकडून केल्या जाणार्‍या अपेक्षा, यामुळे वयात येणार्‍या मुला-मुलींची घुसमट होते. कुटुबांत संवाद नसेल तर त्यांची भावनिक गरज कुटुंबातून पूर्ण होऊ शकत नाही. ती ते बाहेर शोधू लागतात. किशोरवयीन मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांचे योग्य वेळी समुपदेशन होणे खूप गरजेचे आहे.
अट्टहास नको
घरातील जबाबदार्‍यांसह बाहेर नोकरी करणार्‍या आई-वडिलांना मुलांच्या भविष्याची काळजी असते. त्यासाठी शाळा-महाविद्यालयाबरोबरच विविध क्लासेसला प्रवेश घेऊन मुलांना सर्वगुणसंपन्न (ऑल राऊंडर) बनविण्याचा अट्टहास केलेला दिसून येतो. या गोष्टीचा मुलांवर नकळत परिणाम होतो. मुले तणावात वावरतात. नकळत सोशल मीडियावर काहीबाही सर्च करून मनोरंजन करण्याकडे वळतात. अनेकप्रसंगी पैसे मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून गेम वा व्हिडिओ बनवून विविध मार्गाने पैसे कमावण्याचे साधन निवडतात.

सध्या सोशल मीडियाच्या वाढत्या जाळ्यामुळे पालक आणि पाल्य यांच्यातील संवाद कमी होत आहे. पालकांकडून पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण, विभक्त कुटुंबपद्धती, संस्कार आणि रूढी-परंपरांकडे झालेले दुर्लक्ष या सर्वांतून वयात येणार्‍या मुला-मुलींवर परिपूर्ण संस्कार होऊ शकत नाही. मूल्यशिक्षणाची रुजवण चांगल्या पद्धतीने झाल्याने पाल्यांवर संस्कारांचा पगडा राहील, पालक पाल्य यांच्यातील वैचारिक मतभेद थांबतील. पालकांनीही जनरेशन गॅप लक्षात घेऊन नव्या पिढीच्या काही गोष्टी सहज स्वीकार करायला पाहिजे. आमच्या वेळी असे नव्हते, तसे नव्हते ही भूमिका न घेता सामंजस्यपणे पाल्यांना वागवणे गरजेचे आहे.
– ज्योत्स्ना डगळे, समुपदेशक

पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र, मैत्रीण म्हणून त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. घरात /बाहेर वावरताना येणारे अनुभव, घडामोडी, चांगले-वाईट अनुभव तो / ती आपल्या पालकाशी मित्र म्हणून शेअर करेल. विद्यार्थ्यांनी नुसते परीक्षार्थी न होण्यापेक्षा ज्ञानार्थ व्हावे. मुलांना त्याच्या आवडीच्या बाबी मनमोकळेपणाने करू द्यायला हव्यात. सोशल मीडिया किंवा मित्रपरिवारावर बारीक लक्ष हवे. यामुळे मुलांमध्ये नैराश्य येत नाही.घरातील वातावरण हसत-खेळत ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी ओळखून वर्तन ठेवावे.
– एस. बी. देशमुख, मुख्याध्यापक
प्रत्येक पालक मुलांनी घरात संवाद ठेवला पाहिजे. पालकांनी मुलाला -मुलीला विश्‍वासात घेऊन विचारले पाहिजे आणि तक्रार न करता, समस्येबद्दल चर्चा केली पाहिजे. मुलाच्या मानसिकतेचे खच्चीकरण न करता त्यांना धोके समजावून सांगणे गरजेचे आहे. घडलेल्या घटनेचेसुद्धा विश्‍लेषण आपल्याला तांत्रिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या आणि योग्य पद्धतीने करून त्याचं मूल्यमापन करून, अधिक चांगला निर्णय घेणे आणि अंमलबजावणी करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
– सविता देशमुख, अधिव्याख्याती
पालकांपासून मुले अनेक गोष्टी लपवून मोबाइलमध्ये ठेवतात. पालकांचे मुलांच्या मोबाइलवर लक्ष असणे गरजेचे आहे. मुले मोबाइलमध्ये काय करतात, कोणाशी बोलतात, कोणते ऍप वापरतात हे बघणे गरजेचे आहे. आपल्या पाल्यांना एखादा मोठा धोका असण्याची भीती असल्यास सायबरतज्ज्ञांच्या मदतीने स्पाय ऍप टाकून आपल्या पाल्यांची सगळी ऍक्टिव्हिटी बघू शकतात. 18 वर्षांखालील पाल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पालक स्पाय ऍप वापरू शकतात. परंतु मोबाइल आणि आपल्या मुलांची सोशल मीडिया चेक करणे गरजेचे आहे.
– ओंकार गंधे (सायबर सुरक्षातज्ज्ञ)
मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुसंवाद असणे खूप गरजेचे आहे. धावपळीचे जग आहे. घरातील सर्व जण पूर्वीच्या तुलनेत खूप व्यग्र झाले आहेत. एकमेकांसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. कोणत्याही विषयावर आपण एकमेकांशी बोलू शकतो हा विश्‍वास घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांच्या मनात निर्माण केला पाहिजे. मोबाइल ़ङ्गोनचा वेळ प्रत्येकाने कटाक्षाने कमी केला पाहिजे. त्यशिवाय प्रत्यक्ष संवाद शक्य नाही. तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यावर भर हवा. मानसिक ताण जास्त वाढल्यास मानसोपचारतज्ज्ञांची अवश्य मदत घ्यावी.
-डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्ज्ञ

Bhagwat Udavant

Recent Posts

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…

1 day ago

नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी

इंदिरानगर :  वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…

2 days ago

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…

2 days ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…

3 days ago

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५’चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…

4 days ago

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको :  विशेष प्रतिनिधी असे…

6 days ago