गुन्हेगारी वाढण्यास सरकार जबाबदार

 

शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचा आरोप

नाशिकः
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गृह, वित्त सारख्या अनेक महत्वाची आणि अर्थपूर्ण खाती त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजप मध्ये दुसरा कोणी आमदार, कार्यक्षम नाही की फडणवीस यांनाच सत्तेचा मलिदा खायचा आहे? असा सवाल शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी करत आता तरी नाशिकसह राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी फडणवीस यांनी स्वत्तंत्र गृहमंत्री द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना प्रवकत्या सुषमा अंधारे यांची कृषीथॉन प्रदर्शनापूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आजचा दौरा अनौपचारिक आहे . नाशिक जिल्ह्यात महा प्रबोधन सभा त्यासाठी येणार आहे १६ ते १८ डिसेंबर रोजी येणार आहे. मी कोणावरही आरोप करत नाही, टीका करत नाही .कुटुंबात काय चुकलं हे विचारण्याचा बहीण म्हणून अधिकार आहे. भाऊ किती उर्मट झाले हे माध्यमे बघत आहे. भाजपच्या वळचणीला गेल्या नंतर त्यांचे संस्कार हिन झाले आहे. गुलाब राव पाटील यांचा माज तसेच अब्दुल सत्तार यांची भाषा बदलली. किरीट सोमय्या यांनी कागदपत्रे काढून काहीच मिळत नाहीये. त्यामुळे सोमय्या यांना एखादं मंत्री पद द्यावे असेही
अंधारे यांनी सांगितले. यावेळी उपनेते सुनिल बागुल, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.

राणे यांच्यावर टीका

मी  कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने राणे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुलांना चांगले संस्कार दिले नसल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळेच आपला नीतू आणि नीलू प्रचंड आघाऊ झाले आहेत. त्यांना आता तरी राणे यांनी काही वेळ काढून शिकवण द्यावी असेही आवाहनही अंधारे यांनी केला.

एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मुलींवर अत्याचार होऊनही राज्य शासन ठोस कारवाई करत नाही. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र आज कोणत्या वळणावर चालला आहे याचा जनतेनेच विचार करावा असे ही अंधारे म्हणाल्या.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago