आजपासून शाळांमध्ये किलबिलाट

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील शाळांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष 13 जून रोजी सुरू झाले असले तरी शाळा मात्र आजपासून सुरू होणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावनंतर दोन वर्षाांनी शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी ,शिक्षकांनासह पालकांमध्ये उत्साह आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून ऑनलाईन शाळा सुरू होत्या. विद्यार्थीही ऑनलाईन शाळेला कंटाळले होते. त्यामुळे   विद्यार्थ्यांनाही शाळेची ओढ लागली होती. प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहात किलबिलाटात मित्र मैत्रिणीसोबत अभ्यास करण्यास सर्वच विद्यार्थांना आवडते.  शहरातील काही शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र आजपासून सर्व शाळा सुरू होणार आहेत. यंदा ऑफलाईन शाळा सुरू हाोणार असल्याने विद्यार्थ्या, पालक तयारीला लागले आहेत. तर शाळांकडूनही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शाळामध्ये विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत करत प्रवेशोत्सव साजरा केला जाणारा आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर शाळेचा पहिला दिवस विद्यार्थाना अविस्मरणीय ठरावा यासाठी शाळाप्रशासनाकडून   गुलाब पुष्प ,चाॅकलेट देत विद्यार्थांचे स्वागत केले जाणार आहे.
यंदा ऑफलाईन शाळा सुरू होणार असल्याने दोन वर्षानंतर शैक्षणिक साहित्य विक्रेते, स्कूल बस वाहन चालक यांना काही प्रमाणात दिलास मिळाला आहे. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची वाट सर्वच जण आतुरतेने पाहत होते.

Ashvini Pande

Recent Posts

सावकार वैभव देवरेच्या  जाचाला कंटाळून ‘ डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाची आत्महत्या

सावकार वैभव देवरेच्या  जाचाला कंटाळून डीएसपी बासुंदी चहा' फेम व्यावसायिकाची आत्महत्या सिडको विशेष प्रतिनिधी सावकारीच्या…

2 days ago

चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे

चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे नाशिक/ काजी सांगवी…

2 days ago

एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा

एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा भात शेतीचे  नुकसान, शेतकरी चिंतेत धामणगांव :   सुनील गाढवे पावसाचे माहेरघर…

3 days ago

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या.

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या इंदिरानगर :  प्रतिनिधी इंदिरानगरमधील साईनाथ नगर चौफुली जवळ…

3 days ago

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच खासदार अखिलेश यादव: मालेगावात समाजवादीची सभा मनमाड :…

4 days ago

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ आ. फरांदे यांचे निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन नाशिक  ः प्रतिनिधी…

4 days ago