नाशिक

ओझरच्या खंडेराव यात्रेत मानाचा घोडा ओढणार बारागाड्या

ओझर : वार्ताहर
ओझरचे ग्रामदैवत व परिसरातील पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बाणगंगा नदी पुलाजवळ असलेले श्री खंडेराव महाराज हे जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. दि. 26 नोव्हेंबरपासून पाच दिवस विविध कार्यक्रमांनी होणार्‍या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे बारागाड्या घोडा ओढतो व परिसर भंडारा, खोबर्‍याच्या उधळणीने पिवळा होतो.
गेल्या सत्तावीस वर्षांपासून बारा वाड्यांचे बारागाडे ओढणारा गंग्या वारू याचे निधन झाल्याने कमिटीने गंग्या वारूचे शिल्प करण्याचा मनोदय व्यक्त करून सर्वांच्या मदतीने 11 लाखांचा पंचधातूचा पुतळा करून घेतला. त्याचे मंदिराच्या समोरच शिल्प उभे करण्यात आल्याने या वर्षीच्या यात्रेचे ते मुख्य आकर्षण ठरणार आहे.
चंपाषष्ठीची यात्रा भाविकांसाठी पर्वणीच असते. भाविक दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठीला खंडेराव महाराजांनी मणी-मल्लाचा वध केल्याची आख्यायिका आहे.पारंपरिकदृष्टया ओझर परिसरातील यात्रोत्सवाला विविध महत्त्व प्राप्त झाले आहे. नंतरच्या काळात मुंबई-आग्रा महामार्गालगत नवीन मंदिर उभारण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने व दिवंगत यात्रा कमिटी अध्यक्ष सुखदेव चौरे यांच्या कार्यकाळात भव्य व आकर्षक मंदिराची बांधणी झाली. मंदिरासमोर भाविकांसाठी प्रशस्त सभामंडप उभारण्यात आला. खंडोबा यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, माणसांनी खच्चून भरलेले मल्हाररथ बारागाडे मानाचा घोडा ओढतो. मल्हाररथ ओढण्याची परंपरा दोनशे-अडीचशे वर्षांपेक्षा अधिक आहे.

षष्ठ यात्रोत्सव

चंपाषष्ठीपर्यंत सहा दिवसांचा हा विधी असल्याने यास षष्ठ यात्रोत्सव असेही म्हटले जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी पहाटे मान्यवरांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात येतो. यात्रेच्या दिवशी घोड्यास सकाळी हळद अंघोळ घालून दोन्ही मंदिरात देवभेट केली जाते. वाजतगाजत घोड्याची पालखीची गावातून मिरवणूक काढून बारागाडे ओढण्याचा कार्यक्रम पार पडतो. यावेळी लाखो भाविक भंडार्‍याची उधळण करीत खंडेराव महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार, अशा घोषणा देतात. रात्री मंदिरासमोर मल्हारभक्तांसह ग्रामस्थ जागरण गोंधळ करतात. दुसर्‍या दिवशी विविध कार्यक्रम होतात.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago