आना ही पडेगा चौपाटी मे
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांना अपत्रतेच्या नोटीसा दिल्या आहेत, त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नरहरी झिरवळ यांचा फोटो टाकून कब तक छुपोगे गोहाटी मे आना ही पडेगा चौपाटी मे असे खोचक ट्वीट केले आहे,
त्यांनी बंडखोरांना मुंबईत येण्याचं आव्हान दिलंय. लपून बसलेल्या शिवसेना आमदारांवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांनी ट्वीट करताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा एक खास शैलीतला फोटोही राऊतांनी पोस्ट केला आहे.
राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रात सत्तेचा आणि सत्तेसाठीच्या समीकरणाचा पेच नाजूक वळणावर आहे. अशात विधानसभा अध्यक्ष नसताना उपाध्यक्षांकडेच विधानसभा अध्यक्षांचे सगळे अधिकार असतात. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलागले आहे,