नाशिक

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चेन स्नॅचिंगच्या घटना

पंचवटी : वार्ताहर
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंगच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी (दि. 25)देखील ओमकारनगरमधील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर आणि एसटी वर्कशॉपजवळील राजमान्य सोसायटीजवळ अवघ्या काही वेळाच्या अंतरात दोन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत कल्पना अनिल माळोदे (वय 52, रा. ओमकारनगर, मखमलाबाद-म्हसरूळ लिंक रोड) आणि सुनंदा भाऊसाहेब काळे (45, रा. राजमान्य सोसायटी नंबर 3, ए विंग, यशोदानगर, पेठरोड, एसटी वर्कशॉपसमोर) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दि. 25 जून रोजी सायंकाळी 7.15 ते 7.30 च्या सुमारास कल्पना अनिल माळोदे या बाजूलाच असलेल्या बाजारात भाजी घेण्यासाठी गेल्या असता, ओमकारनगर, विठ्ठल मंदिरासमोरील आशिष सोसायटीजवळून भाजी घेऊन पायी चालत येत असताना समोर आलेल्या मोटारसायकलवरील दोघे मोटारसायकल उभी करून मोबाईलवर बोलत होते. त्यावेळी त्या चालत असताना त्यातील एकाने निळा शर्ट, तर गाडी चालविणार्‍या एकाने पांढरा शर्ट, डोक्यात हेल्मेट घातले होते. त्यातील निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्याने पायी येत गळ्यातील 52 हजार रुपयांची सात ते आठ ग्रॅमची सोन्याची पट्टी पोत खेचून पळत जात त्याच्या मित्राच्या स्कूटीवर बसला. त्यावेळी त्याच्या पाठीमागे पळत जात चोर चोर असा आरडाओरड केला. त्यांच्या मोटारसायकलचा नंबर पाहिला, परंतु तो जोरात असल्याने मला त्या गाडीचा नंबर दिसला नाही आणि ते दोघे ओमकारनगरच्या दिशेने पळून गेले.
सायंकाळी पावणेआठच्या सुमारास सुनंदा भाऊसाहेब काळे यांच्या गळ्यातील एक लाख 50 हजार रुपयांची दोन तोळे ग्रॅम वजनाचे सोन्याची पट्टी मंगळसूत्र खेचून पोबारा केला आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे तपास करत आहेत.

 

Gavkari Admin

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

1 hour ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

1 hour ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

1 hour ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

1 hour ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

2 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

2 hours ago