नाशिक

दुचाकी चोरी करणारे दोन विधिसंघर्षित बालके ताब्यात

3 चोरीच्या गाड्या जप्त

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार व पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहा. पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. 1 ने मोठी कामगिरी बजावली आहे.
दि. 12 मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने मोतीवाला कॉलेज परिसरात सापळा रचून एक विधिसंघर्षित बालक ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची अ‍ॅक्टिव्हा मोपेड हस्तगत झाली. चौकशीदरम्यान त्याने आणखी दोन मोटारसायकल चोरीची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी दुसर्‍या एका विधिसंघर्षित बालकाच्या घरावर छापा टाकून दोन मोटारसायकली हस्तगत केल्या. या दोघांकडून एकूण 60 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोहवा नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, रोहिदास लिलके, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, पोना विशाल देवरे, पोअं अमोल कोष्टी, मपोअं मनीषा सरोदे यांचा समावेश होता.
दोन्ही विधिसंघर्षित बालके व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Gavkari Admin

Recent Posts

गोदावरीची महाआरती 200 युवा सैनिकांच्या हस्ते

नाशिक ः प्रतिनिधी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे होणार्‍या गोदावरी महाआरतीस…

8 hours ago

विभागात पॉलिटेक्निकच्या 24,680, आयटीआयच्या 15,224 जागा

नाशिक ः प्रतिनिधी इयत्ता दहावीचा राज्य शिक्षण मंडळासह सीबीएसईचाही निकाल जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचा…

8 hours ago

पाथर्डीत अवकाळी पावसामुळे गटारी तुंबल्या

सुदाम डेमसे यांच्या मध्यस्थीने तत्काळ कार्यवाही सिडको : विशेष प्रतिनिधी प्रभाग 31 पाथर्डी परिसरात झालेल्या…

8 hours ago

पावसाळ्यापूर्वी धरणांमधील गाळ काढा

जि. प. सीईओ मित्तल : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण, तलावांतून…

9 hours ago

पाइपलाइनसाठी तीनशे झाडांवर कुर्‍हाड!

वृक्षप्रेमींकडून विरोध होण्याची शक्यता नाशिक : प्रतिनिधी जुन्या जलवाहिनीची वारंवार गळती होत असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी…

9 hours ago

चेतनानगरमध्ये गाडीची काच फोडून मुद्देमाल लंपास

सिडको : चेतनानगरमधील बाजीराव आव्हाड चौक परिसरात पार्क केलेल्या क्रेटा गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्याने…

9 hours ago