नाशिक

बोरगाव चिखलीत दोन चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू

सुरगाणा : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरगावजवळील चिखली येथे हौदात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मृत दर्शन जगदीश भोये (वय 4), तन्मय नीलेश भोये (वय 3, दोघे रा. चिखली) हे सकाळी दहाच्या सुमारास घराजवळ खेळत होते. जवळच घर बांधकामासाठी खोदलेल्या पाणी साठवण खड्ड्यातील पाण्यात बुडून या दोन्ही बालकांचा मृत्यू झाला आहे.
ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली.पाण्यातून काढून त्यांना तत्काळ उपचारासाठी बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक अहवालानुसार वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी दोन्ही मुलांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. चिखली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन्ही मुले चुलतभाऊ असल्याने शोककळा पसरली आहे. चणकापूर धरणात पोहण्यासाठी पाण्यात बुडालेल्या तरुणाची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Two children drown in a pond in Borgaon mud

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago