नाशिकरोड कारागृहाचे दोन डॉक्टर लाच घेताना जाळ्यात

कारागृहाचे दोन डॉक्टर लाच घेताना जाळ्यात

नाशिक : प्रतिनिधी
शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयांची लाच घेताना नाकिरोड कारागृहाच्या दोन वैद्यकीय अधिकार्‍यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभगााच्या पथकाने रंगेहाथ पकडले. डॉ. आबिद आबू  अत्तार (40), डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (42)  रा. इंदिरानगर, नाशिक अशी या लाचखोर वैद्यकीय अधिकार्‍यांची नावे आहेत.
तक्रारदार यांचे मित्र हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून, शासकिय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे तसेच ज्या कैद्याने 14 वर्षे शिक्षा भोगलेली आहे. अशा कैद्यांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते.  परंतु अशा कैदांना बाहेर सोडण्यासाठी  मुख्य वैद्यकिय अधिकारी यांच्या फिटफॉर सर्टिफिकेटची गरज असते. म्हणून दोघा वैद्यकीय अधिकार्‍यांनी तक्रारदाराच्या मित्रांकडे  चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले. काल पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना दोघा वैद्यकीय अधिकार्‍यांना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत ,राजेंद्र सानप, हवालदार प्रभाकर गवळी,
प्रफूल्ल माळी, हवालदार संतोष गांगुर्डे, किरण धुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Bhagwat Udavant

Recent Posts

बहिणीच्या लग्नाला जमविलेली पुंजी सहीसलामत

आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…

30 minutes ago

कला मेळाव्याने शिक्षणाला नवा आयाम

नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…

54 minutes ago

आरोग्य कर्मचार्‍यांचा सेल्फी हजेरीला विरोध

जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्‍यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक…

1 hour ago

अपहृत मुलीची उत्तरप्रदेशमध्ये यशस्वी सुटका

पंचवटी : वार्ताहर मखमलाबाद येथून अपहरण केलेल्या मुलीची म्हसरुळ पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून यशस्वी सुटका केली.…

1 hour ago

फसवणुकीची साडेतीन कोटींची रक्कम फिर्यादीला परत

  सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक शहरातील सायबर पोलीस ठाण्याने एक महत्त्वपूर्ण आणि जलद कारवाई…

1 hour ago

घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले, नंतर बायको- सासूलाही पेटवले

  घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही...     नाशिक: …

22 hours ago