विंचूर : येथून जवळच असलेल्या विष्णूनगर येथे दोन घरफोड्या होऊन दागिन्यांसह रोख रक्कम चोरी गेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. विष्णूनगर येथील आण्णा वामन घायाळ हे दि.14 रोजी रात्री साडेबारा वाजेपर्यंत टीव्ही बघून कुटुंबांसह घराच्या ओट्यावर झोपले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी अण्णा घायाळ यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लहान मुलाचे कानातील सोन्याच्या बाळ्या, चांदीच्या तोळबंद्या, सोन्याचे ओमपान तसेच बारा हजार रोख रक्कम देऊन पोबारा केला.दरम्यान, चोरट्यांनी मागील दरवाजाजवळ हल्ला करण्याच्या उद्देशाने दगडगोटे जमा करून ठेवले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा शिवाजी बंडू घायाळ यांच्या वस्तीवर वळविला.शिवाजी घायाळ यांचाही पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून किचनमधून आत प्रवेश केला. कपाटमधील तीन हजार रुपये घेऊन पोबारा केला. दोन्ही कुटुंब सकाळी झोपेतून उठल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आण्णा घायाळ यांनी पोलीस पाटील रामकिसन सुराशे यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी लासलगाव पोलीस ठाण्यास चोरीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने…
नाशिक: प्रतिनिधी सिन्नर तालुक्यात पावसामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना आज घडली. मौजे नळवाडी, ता.…
अंदमानही व्यापला; 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे : यंदा मॉन्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात…
चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले मनमाड : प्रतिनिधी अंतापूर-ताहाराबादवरून देवदर्शन करून परतणार्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला.…
नाशिक : प्रतिनिधी इयत्ता 11 वी प्रवेशाच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, नाशिकमधून तब्बल 371 शाळा…
शहापूर ः प्रतिनिधी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राइक केला. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर…