नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी

वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना  नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त व लेखा विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडले.

कनिष्ठ लेखाधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद कार्यालय नाशिक.किरण रंगनाथ दराडे वय-40 व. कनिष्ठ सहाय्यक (लेखा )वित्त विभा सचिन प्रभाकर पाटील वय 40  अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदार हे शिक्षक असून त्यांचे व इतर 17 शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांच्या सेवा पुस्तकासह एकूण 18 सेवा पुस्तके लोकसेवक क्रमांक एक यांच्याकडे जमा केली होते सदर 18 शिक्षकांची वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून  वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदार यांच्या समक्ष सुरुवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे 700/-रुपये याप्रमाणे 18 सेवा पुस्तकांचे 12600/- रुपयांची मागणी करून,  तडजोडीअंती  11000/- रुपयांची मागणी करून सदर  लाचेची रक्कम लोकसेवक क्रमांक एक यांच्या सांगण्यावरून लोकसेवक क्रमांक दोन यांनी सदरची रक्कम लाचेची आहे  हे माहीत असताना देखील स्वीकारल्याने त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक  येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक,श्रीमती मीरा वसंतराव आदमाने     पो. हवा.पंकज पळशीकरपो.हवा.प्रमोद चव्हाणके पो.हवा. संदिप वणवे यांच्या पथकान पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा     घारगे-वालावलकर अपर पोलिस अधिक्षक,माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

Bhagwat Udavant

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

4 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

4 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

4 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

4 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

5 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

5 hours ago