राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार
केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस
काजी सांगवी : वार्ताहर
चांदवड येथे डॉ राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन केदा नाना आहेर यांना उमेदवारी मिळावी या साठी मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे. मागणीला वरीष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दिला आहे. महायुतीकडून ही जागा भाजपाला मिळाल्या नंतर महायुतीचे उमेदवार केदा नाना आहेर असणार हे या प्रसंगी डॉ राहुल आहेर यांच्या कडुन घोषित करण्यात आले गेल्या 10 वर्षात केदा नानांनी मोठे मन करून मला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे या वेळेस केदा नाना यांना संधी देण्यात आली असे या प्रसंगी नमूद करण्यात आले आहेर कुटुंब गेल्या 40 वर्षा पासून राजकारणात आहे आमचे कुटुंब सतत एकत्र राहून निर्णय घेते त्यामुळे राजकारणा पलीकडे पण कुटुंब व्यवस्था आहे. ती टिकली पाहिजे तसेच या विधांसभेमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येऊन सत्ता महायुतीला मिळावी या साठी किती पण त्याग करायला तयार आहे असे या प्रसंगी नमूद करण्यात आले.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…