नांदगावला भीषण अपघातात दोन जण ठार तर 6 जण गंभीर
मनमाड :आमिन शेख
नांदगाव मनमाड माहामार्गावर हिरेनगर फाट्यावर एक्सयूव्ही व टीयूव्ही या फोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली असुन हा अपघात इतका भीषण होता की यात गाड्याचा अक्षरशः चुरा झाला आहे जे दोन मयत झाले त्यांचे नाव अद्याप समजले नसुन आशा शिवाजी देशमुख वय 55 मोहाडी विकास शिवाजी देशमुख वय 35 मोहाडी
नारायण सुखदेव महाजन वय 70 पाचोरा गराबाई अधिक देशमुख वय 60 मोहाडी अशी चार जखमींची नावे आहेत घटनेची महिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले स्थानिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.