मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यू

मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यू

मनमाड : आमिन शेख

येथील चांदवड रोडवर दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सपडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मनमाड येथील चांदवड रोडवर पाटील गॅरेज समोर चांदवड कडुन मनमाडकडे येत असताना रस्त्यात गायी अंगावर आल्याने त्यांना वाचवताना बॅलन्स जाऊन मोटारसायकल पडली व यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने या दोघांनाही चिरडले यात  मोटारसायकल वरील  आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकान राहणार हनुमान नगर या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे.अपघात इतका भीषण होता की या दोन्ही मुलांचा अक्षरशः चुरा झाला यामुळे यांची ओळख पटने देखील शक्य नाही त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोकाट जनावरे आणि रोजची वाहतुक कोंडीमुळे अपघात

मनमाड शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे फिरत आहेत याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या मात्र कोणीही याबाबत दखल घेत नाही याशिवाय चांदवड रोड मालेगाव रोड व येवला रोड या महामार्गावर मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असते यामुळे देखील रोज अपघात होत असतात आजही मोकाट जनावरामुळे दोन शाळकरी मुलाचा जीव गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *