प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी तपोवन एक्स्प्रेस एक किलोमीटर रिव्हर्स
मनमाड : एखाद्याला जीवनदान देण्यासारखे पुण्याचे काम या जगात दुसरे नाही त्यात जर एखाद्या धावत्या रेल्वेमधुन जर कुणी पडले असेल तर त्याच्यासाठी रेल्वे थांबत नाही असे आपण नेहमीच बघतो मात्र आज याउलट घटना घडली आहे मुंबई वरून नांदेड कडे जाणारी तपोवन एक्सप्रेस मनमाड यार्डात (हद्दीत) आली असतांना एक प्रवाशी पडला असल्याचे समजले आणि काय मग रेल्वे ड्रायव्हर आणि गार्डने थेट एक ते दिड किलोमीटर मागे घेतली व इतर प्रवाशांचा मदतीने जखमी असलेल्या सहप्रवाशांला गाडीत टाकून मनमाड रेल्वे स्थानकावर आणले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले रेल्वे ड्रायव्हरच्या माणुसकीने आज एकाचे प्रान वाचल्याचे बघावयास मिळाले.