लक्ष्यवेध : प्रभाग-21
नाशिकरोडच्या मध्यवर्ती भागात आणि मुख्य बाजारपेठेच्या केंद्रस्थानी असलेला प्रभाग क्रमांक 21 हा नाशिकरोडमधील सर्वांत महत्त्वाचा आणि सर्वाधिक चर्चेत राहणारा प्रभाग मानला जातो. व्यापारी गल्ली, वस्त्या, उच्चभ्रू इमारती, झोपडपट्ट्या, शासकीय कार्यालये आणि मोठी बाजारपेठ यांचे मिश्रण असलेला हा प्रभाग नाशिकरोडचा खर्या अर्थाने सिटी सेंटर आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2017 च्या निवडणुकीत शिवसेना एकसंघ असताना सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे आणि ज्योती खोले हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. नंतरच्या राजकीय घडामोडींत हे तिन्ही शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. भाजपकडून कोमल मेहरोलिया विजयी झाल्या होत्या. त्यामुळे एकसंघ शिवसेनेचे मतदान आता ठाकरे आणि शिंदे या दोन गटांत विभागण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर होणार आहे.
यंदा या प्रभागात सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे आणि ज्योती खोले हे शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. तर कोमल मेहरोलिया भाजपकडून पुन्हा मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे शिंदे गट, ठाकरे गट, भाजप, अशी तिरंगी लढत असली, तरी रिपाईं आठवले गट व मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस उतरले तर शहरातील वेगळी रंगत या प्रभागात दिसणार आहे.
प्रभागाचा व्याप मोठा असल्याने सामाजिक रचनाही अत्यंत विविध आहे. जैन समाज, व्यापारीवर्ग, मराठा, माळी, मागासवर्गीय समाज, तसेच अल्पसंख्याकांची लक्षणीय संख्या या भागात आहे. सुभाष रोड, मालधक्का रोड, गोसावीवाडी, रमाबाई आंबेडकरनगर, फर्नांडिसवाडी, राजवाडा, चंदनवाडी, जगताप मळा, आनंदनगर, खोले मळा अशा विविध वस्त्या ते उच्चभ्रू इमारती आणि व्यापारी गल्ली यांचा समावेश या प्रभागात होतो.
या प्रभागात महत्त्वाची ठिकाणे असल्याने त्याला शहरात विशेष स्थान प्राप्त झाले आहे. महापालिकेचे विभागीय कार्यालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरण तलाव, सराफ बाजार, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, किराणा होलसेल मार्केट, मुक्तिधाम, चित्रपटगृहे यांसारख्या प्रमुख स्थळांमुळे हा प्रभाग नाशिकरोडचा केंद्रबिंदू ठरतो.
2011 नुसार लोकसंख्या
लोकसंख्या ः 47,168
अनुसूचित जाती ः 10,722
अनुसूचित जमाती ः 990
विद्यमान नगरसेवक
सूर्यकांत लवटे,
रमेश धोंगडे,
ज्योती खोले,
कोमल मेहरोलिया
इच्छुक उमेदवार
शिवसेना शिंदे गट ः सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले, अवंतिका वाघ,
सुमित वाघ.
शिवसेना ठाकरे गट ः सुधाकर जाधव, मसूद जिलानी, भय्या मणियार, अतुल धोंगडे, जयंत गाडेकर, गंगाधर उगले, समर्थ मुठाळ, अनिता सागर निकाळे, सुवर्णा काळुंगे, अश्विनी स्वप्नील आवटे, श्रद्धा समर्थ मुठाळ, प्रतीक जाचक, संजय गायकवाड, रवींद्र सांत्रस, प्रशांत जाधव, वैभव वाळेकर, विजय भालेराव, संजय भालेराव.
रिपब्लिकन पक्ष आठवले गट ः नयना सुनील वाघ, समीर शेख, राम बाबा पठारे.
भाजप ःकोमल मेहरोलिया, नितीन खोले, संतोष क्षीरसागर, संगीता क्षीरसागर, भावना जयंत नारद, मनीषा संघवी, निर्मल भंडारी, रणजित नगरकर, अजित गायकवाड, शिवनारायण सोमाणी, प्रणिता जगताप, जयश्री कोचरमुथा.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ः चंद्रकांत साडे, मंगेश लांडगे, संजय जाधव, करुणा बर्वे, अर्पणा जाधव, हर्षदा निकम, नीलम जाधव (वायकर), परवीन नियामत शेख, गौरी लक्ष्मण वाल्मीकी.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ः अशोक पाटील, मुन्नाभाई अन्सारी.
मनसे ः प्रकाश कोरडे, श्याम गोहाड, संतोष सहाणे, प्रेरणा जाधव (चंद्रमोरे).
काँग्रेस ः आशा निकाळे, कामिल इनामदार, उमेश दासवानी, सत्तार सय्यद, रिजवाना सय्यद, संजय पितळे.
प्रभागात झालेली कामे
लिंगायत कॉलनी ते जैन भवन ट्रीमिक्स रोड, गाडेकर मळा ग्राउंड व जॉगिंग ट्रॅक उभारला. संपूर्ण प्रभागात कॉलनी रस्त्यांचे डांबरीकरण. जय भवानी रोड परिसरात वीस लक्ष घनफूट क्षमतेची पाण्याची टाकी व विविध जलवाहिन्यांची योजना पूर्ण. सुभाष रोड जावाउद्दीन डेपोमधील मटण मार्केटची इमारत पूर्णत्वाकडे. मैदान विकसित.
सेनेतील फुटीचा प्रभाव
राजकीय दृष्टीने पाहता हा प्रभाग नेहमीच लढतीचा केंद्रबिंदू राहिला आहे. यंदाही तशीच परिस्थिती आहे. शिवसेनेत पडलेली फूट निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा प्रभाव टाकणार आहे. परंपरागत मतांचे काय होणार? भाजप लाभ घेणार का? की दोन्ही शिवसेना गटांपैकी कुणी एक पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करणार? हे सर्व निकालानंतरच स्पष्ट होणार असले, तरी एक गोष्ट निश्चित की, प्रभाग क्रमांक 21 मधील निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहील.
प्रभाग परिसर
दुर्गा उद्यान परिसर, रेल्वे स्थानक, देवी चौक, मालधक्का रोड, सुभाष रोड, धोंगडेनगर, आनंदनगर, गुलमोहर कॉलनी, फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड परिसर, लिंगायत कॉलनी, देवळाली राजवाडा.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…