नाशिक

तब्बल 21 हजार टन फुलांची निर्यात

भारताला 749 कोटी परकीय चलन; अमेरिका, जर्मनीत मागणी

लासलगाव : समीर पठाण
भारताची फुलांच्या निर्यात क्षेत्रात झेप कायम आहे. कृषी आणि प्रक्रिया, अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत देशातून 21,024.41 टन
फुले व उत्पादने निर्यात झाली आहेत. यातून 749.17 कोटींंचे परकीय चलन देशाला मिळाले आहे.
भारत सरकारने फुलशेतीला सूर्योदय उद्योग म्हणून ओळखले आहे आणि त्याला 100 टक्के निर्यातभिमुख असा दर्जा दिला आहे. फुलांच्या फळबाग लागवडीच्या मागणीत निरंतर वाढ होत असल्याने कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचा व्यावसायिक व्यवसाय झाला आहे. म्हणूनच व्यावसायिक फुलशेती ग्रीन हाउसच्या अंतर्गत हवामान नियंत्रित हाय-टेक अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून उदयास आले आहे.
फुलांच्या निर्यातीमध्ये गेल्या काही वर्षांपासून स्थिर वाढ दिसत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी निर्यात मूल्यामध्ये वाढ झाली असून, भारत जागतिक फूल बाजारात आपली उपस्थिती मजबूत करत आहे.

फुलशेतीतून 749 कोटींची निर्यात ही सकारात्मक बाब असली, तरी भारताचा जागतिक बाजारातील वाटा अत्यल्प आहे. शाश्वत वाढीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र, दर्जेदार रोपे, निर्यातक्षम जाती आणि शेतकर्‍यांमध्ये जागरूकता या बाबींवर भर देणे आवश्यक आहे. फुलशेतीकडे आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.

प्रमुख निर्यातक्षम फुले

गुलाब, रजनीगंधा, ग्लॅडिओलस, अँथुरियम, कार्नेशन, जासमीन, ऑर्किड, ट्यूलिप आणि झेंडू ही प्रमुख निर्यात होणारी फुले आहेत.

प्रमुख बाजारपेठा

भारतीय फुलांना सर्वाधिक मागणी अमेरिका, नेदरलँड्स, यूएई, यूके, जर्मनी, मलेशिया, इटली, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांकडून येते.

फुलशेती निर्यात आकडेवारी (टनांत)
सन 2019-20      16971 टन
सन 2020-21      15844 टन
सन 2021-22      23597 टन
सन 2022-23      21024 टन
सन 2023-24      19677 टन
सन 2024-25      21039 टन

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

16 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

16 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

16 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

16 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

16 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

17 hours ago