इगतपुरी :
इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरातील दारणा नदीपात्रात आज मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघे भावंडे पाण्यात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली. देवळे शिवारातील पाणी पात्रात हे दोघे बुडल्याची भीती व्यक्त करण्यात आली. इगतपुरी जवळील फणसवाडी येथील हे युवक असल्याचे समजते.
दरम्यान घडलेली घटना अशी की इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरातील रेल्वे स्टेशन व देवळे पूल दरम्यान काल साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फणसवाडी ता इगतपुरी येथील चार पाच मच्छीमार युवक मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासेमारी करण्याच्या प्रयत्नात गळ टाकून मासेमारी करत असताना एकाच गळ अडकल्याने गळ काढण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात बालाजी काशिनाथ पिंगळे वय 27 याचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडू लागला त्याचाच भाऊ पंकज काशिनाथ पिंगळे याने भावाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र दारणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असल्याने हे दोघेही भावंडे बुडल्याने सोबतच्या युवकांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकबव युवकांनी धाव घेऊन बुडालेल्या युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी शिवाजी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत यंत्रणेला माहिती दिली.घटनास्थळी उशिरपर्यत शोधकार्य व मदतकार्य सुरू होते. दरम्यान शोधकार्यासाठी कसारा येथील जीवरक्षक पथकाला बोलावण्यात आले मात्र रात्र पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…
*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…
सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…