नाशिक-पेठ महामार्गावर दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

उमराळे बुद्रुक वार्ताहर
नाशिक पेठ महामार्गावर नाशिककडून येणार्‍या दुचाकीने कारला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. कारमधील एकजण जखमी झाला. नाशिककडून उमराळे बुद्रुक येथील वैभव गजानन खिरकाडे (28) सुनील मुरलीधर माळेकर ( 39) हे मोटरसायकल क्रमांक एम एच 15 जीएम 39 74 उमराळे बुद्रुक येथे जात असताना नाशिक पेठ महामार्गावरील निसर्ग हॉटेलच्या वळणावर मोटरसायकलचा ताबा सुटल्याने पेठकडून येणार्‍या मारुती कार क्रमांक एम एच 15 जीएफ 17 94 हिला धडक दिल्याने सुनील मुरलीधर माळेकर राहणार उमराळे बुद्रुक हा जागीच ठार झाला तर वैभव गजानन खिरकाडे नाशिक ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल करताच मृत्यू झाला. अपघाताची माहिती डी आय वाघमारे यांना मिळताच तेथील घटनेचा पंचनामा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *