महाजनको-एनटीपीसीचा ऐतिहासिक करार; सिन्नरच्या विकासाला नवी ऊर्जा
सिन्नर : प्रतिनिधी
वर्षानुवर्षे रखडलेला सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्प आता पुन्हा कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी 270 मेगावॉट क्षमतेचे दोन युनिट सुरू करण्याचे उद्दिष्ट महाजनकोने निश्चित केले आहे. या दिशेने निर्णायक पाऊल टाकत महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महाजनको) आणि एनटीपीसी लिमिटेड यांच्यात नवी दिल्ली येथे सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेडच्या अधिग्रहणासाठी भागधारक करारावर अधिकृत स्वाक्षरी करण्यात आली.
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) मंजूर केलेल्या ठराव योजनेनुसार 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत 3800 कोटी रुपये महाजनको व एनटीपीसीकडून भरण्यात येणार आहे. त्यानंतर सिन्नर थर्मल प्रकल्पाचे औपचारिक हस्तांतरण या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया
कार्पोरेट दिवाळखोरी निवारण कायदा (आयबीसी) 2016 अंतर्गत राबविण्यात येत आहे. नवी दिल्ली येथील एनटीपीसीच्या स्कोप कार्यालयात झालेल्या करारावेळी महाजनकोकडून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., संचालक (प्रकल्प) अभय हरणे, मुख्य अभियंता (प्रकल्प व नियोजन) अतुल सोनजे, तर एनटीपीसीकडून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग, संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन, संचालक (संचलन) रविंदर सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिन्नर परिसराला मिळणार नवा श्वास
सिन्नर थर्मल प्रकल्प पुन्हा सुरू झाल्यास सिन्नर व परिसरातील शेकडो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. रस्ते, वाहतूक, निवास व इतर पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या वाढत्या औद्योगिक व घरगुती वीज गरजांची पूर्तता करण्यासाठी हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावणार आहे.
कोळसा पुरवठ्यासाठी हालचाली सुरू
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी पहिल्या टप्प्यात दोन युनिट सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असलेला कोळसा पुरवठ्यासाठी महाजनकोचे वरिष्ठ अधिकारी देशपातळीवरील कोळसा पुरवठा करणार्या कंपन्यांशी चर्चा करत आहेत, अशी माहिती महाजनकोचे मुख्य अभियंता अतुल सोनजे यांनी दिली.
Two units of Sinnar Thermal to be commissioned before Kumbh Mela
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…