नाशिक

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी पाचच्या सुमारास दर्शन करून परतत असलेली भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन महिल ठार, तर तेरा भाविक जखमी झाले.
कांताबाई नारायण गायके (56, रा. खामगाव, ता. कन्नड) व कमलबाई शामराव जगदाळे (वय 62, रा. जानेफळ, ता. वैजापूर) या दोन महिला मृत झाल्या. इतर भाविकांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना मार लागला आहे.
चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, अप्पा सोपान राऊत, श्रावणी अप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले, आदित्य योगेश कवडे आदी भाविक जखमी झाले. जखमींना प्रथम बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी सर्वांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी भाविक व पर्यटकांनी धाडस करून दरीत उतरून जखमींना बाहेर काढले व स्वतःच्या वाहनांतून आरोग्य केंद्रात पोहोचवले. स्थानिकांचा तत्पर सहभाग या दुर्घटनेत महत्त्वाचा ठरला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस हवालदार भास्कर बस्ते, पोलिस शिपाई परमेश्वर श्रीखंडे, होमगार्ड ऋषिकेश पठाडे व गणेश इप्पर यांनी मदतकार्य केले.
चार दिवसांपूर्वी याच घाटात झालेल्या अपघातातही भाविक जखमी झाले होते. सलग दोन दुर्घटनांमुळे पिनाकेश्वर घाटातील सुरक्षेच्या प्रश्न गंभीर बनला आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

4 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

5 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

5 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

5 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

5 hours ago

समाजकल्याण विभागाला लाभल्या पहिल्या महिला आयुक्त

दीपा मुधोळ-मुंडे यांनी लावला प्रशासकीय कामाचा धडाका नाशिक : प्रतिनिधी बीड जिल्ह्याच्या प्रथम महिला जिल्हाधिकारी…

6 hours ago