प्रवासी व नागरिकांमध्ये प्रचंड संताप
सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडको, इंदिरानगर परिसरात सिटीलिंक बसचालकांकडून बेफिकीरपणे वाहन चालविण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे प्रवासी व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही बस चालकांकडून सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे आणि अचानक लेन बदलणे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर आणि पाथर्डी फाटा परिसरात सिटीलिंक बसचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. बसचालकांना योग्य प्रशिक्षण न देता संबंधित ठेकेदारांकडून नियुक्ती करण्यात आल्याने ही समस्या गंभीर बनल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
अनेक चालकांना मार्गांची, सिग्नल प्रणालीची आणि वाहतूक नियमांची पुरेशी माहिती नसल्याने प्रवाशांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत बसचालकांकडून वाहन बेदरकारपणे चालविले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या बेफिकीर वाहनचालकांमुळे अनेकदा अपघात घडले असून काही प्रकरणांची नोंद पोलिस ठाण्यांमध्येही करण्यात आली आहे. तरीदेखील संबंधित ठेकेदार आणि सिटीलिंक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
प्रवासी तसेच स्थानिक वाहनचालकांनी या चालकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सिटीलिंक प्रशासनाने चालकांना चांगले प्रशिक्षण देऊन शिस्तबद्धतेवर लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…